IMG-20230430-WA0273

लोंढा प्रतिनिधी;

गेल्या 2018 च्या निवडणुकीत लोंढा जिल्हा पंचायत क्षेत्रात भारतीय जनता पार्टीने गमावलेले मतदार पुन्हा जोडून भारतीय जनता पार्टीला या वेळेच्या निवडणुकीत उच्चांक साधून लोंढा जिल्हा पंचायत क्षेत्रातून भरघोस मध्ये देण्याचा निर्णय या भागातील कार्यकर्त्यांनी हाती घेतला आहे.

प्रामुख्याने माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबुराव देसाई यांच्या नेतृत्वाखाली आज लोंढा येथे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल हलगेकर यांच्या उपस्थितीत भव्य रोडशो काढण्यात आला त्यानंतर जाहीर सभा घेण्यात आली लोंढा भागामध्ये गेल्या दोन-तीन निवड जिल्हा पंचायत निवडणुका बाबुराव देसाई यांच्या धर्मपत्नी अंजना देसाई यांनी भाजपाचे वर्चस्व कायम राखले आहे. त्यामुळे हा भाग भाजपचा बालेकिल्ला समजला जातो परंतु 2018 च्या निवडणुकीत या भागातून भाजपला अपेक्षित मतदान झाले नव्हते. त्यामुळे या वेळेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय या भागातील अनेक कार्यकर्त्यांनी हाती घेतला आहे. त्यामुळे भागातील अनेक भाजपाचे कार्यकर्ते सक्रिय झाले असून लोंढा, मोहितेत, घोटगाळी, कापोली, गुंजी, शिंदोळी, नागरगाळी या भागातून यावेळी मताधिक्य यासाठी कार्यतत्व राहिले आहेत.

लोंढा येथे झालेल्या आजच्या प्रचार सभेमध्ये या भागातील इनामदार अनंत देसाई, माजी जिल्हा पंचायत सदस्य पीवाय देसाई, रामचंद्र देसाई, मनोहर कदम, माजी ता.प सदस्य दिगंबर बेळगावकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य अंजना देसाई यासह या भागातील अनेक लोकप्रतिनिधी ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य व भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबुराव देसाई यांनी उपस्थितांचे स्वागत केले. व या भागातून कोणतेही गट तट समोर न आणता विठ्ठल हलगेकर यांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी एकजूट राखावी असे आवाहन केले.

उमेदवार विठ्ठल हलगेकर यांनी, खानापूर तालुक्यात एक भारतीय जनता पार्टीचा पाईक म्हणून आपण काम करणार आहे. भाजपाने जरी मला आमदार केला तरी या भागातला प्रत्येक कार्यकर्ता हा आमदार असेल. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रामुख्याने स्थानिक कार्यकर्त्यांनाच वाव दिला जाईल, यामुळे प्रत्येक कार्यकर्ता हा आगामी पाच वर्षाच्या काळात सक्रिय लोकप्रतिनिधी म्हणून काम करील यासाठी सर्वांनी भाजपच्या पाठीमागे राहून भाजपचा आमदार करावा आपणही विकासात्मक कामे राबवत असताना औद्योगिक विकास करण्यासाठी आपला प्रयत्न राहणार असल्याचे यावेळी प्रचार सभेत भाजपा अध्यक्ष संजय कुबल, प्रमोद कोचेरी, सुरेश देसाई, किरण येळूरकर, अशोक देसाई, राजश्री देसाई, प्रभारी सुवर्णा पाटील, धनश्री सरदेसाई यासह अनेकांनी सहभाग घेतला होता.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us