कणकुंबी: भारतीय जनता पार्टीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ खानापूर तालुक्याच्या जांबोटी भागातील होळद गोल्याळी भागात झजावती प्रचार करण्यात आला यावेळी गावातील अनेक भागात कोपरा सभा घेण्यात आली. यावेळी येत्या दहा तारखेला विधानसभेच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे अनेक नागरिक पंच कमिटी व महिला वर्गांनी बोलून दाखवला. हुळंद येथे कोपरा सभा घेण्यात आली यावेळी गावातील अनेक नागरिकासह मान्यवर मंडळी उपस्थित होते त्यावेळी भाजपा उमेदवार विठ्ठल हलगेकर यांनी भाजप आणि खानापूर तालुक्याच्या विकासाबद्दलची सद्य परिस्थिती व आगामी काळातील योजना या संदर्भात त्यांनी माहिती दिली.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे रमेश पाटील, लक्ष्मण झांजरे व प्रमुख पदाधिकारी,हुळंद गावातील कृष्णा गावडे,बाबू गावडे,राजू गावडे,संदीप गावडे हे प्रमुख कार्यकर्ते व महिला गावातील जेष्ट नागरिक उपस्थित होते.
गोल्याळी येथे भारतीय जनता पार्टी खानापूर मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार विठ्ठल.सो.हलगेकर यांची प्रचार सभा झाली या ठिकाणी घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठी-भट्टी घेतल्या यावेळी येथील युवावर्ग व पंच कमिटीने एक मुखी पाठिंबा भारतीय जनता पार्टीचे असल्याचा दावा केला. रमेश पाटील,लक्ष्मण झांजरे, महेश गुरव, पुंडलिक पाटील प्रमुख पदाधिकारी, गोल्याळी गावातील महादेव गुरव, शिवाजी गुरव, विठ्ठल गुरव, रामा गुरव,तानाजी गुरव, पांडुरंग गुरव ,पुंडलिक गवस, हे प्रमुख कार्यकर्ते युवक,महिला गावातील जेष्ट नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बेटगेरी गावातही अधिकृत उमेदवार मा. विठ्ठल.सो.हलगेकर यांची प्रचार सभा झाली व यावेळी ग्रामस्थांनी भाजपच्या पाठीशी उभा राहण्याची काही दिली. यावेळी त्यांच्या समवेत रमेश पाटील,लक्ष्मण झांजरे गावातील नागरिक महेश गुरव, पुंडलिक पाटील प्रमुख पदाधिकारी, बेडगेरी गावातील नागो कोलेकर, गोविंद पाटील,महादेव गुरव हे प्रमुख कार्यकर्ते युवक,महिला गावातील जेष्ट नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.