खानापूर : खानापूर विधानसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या प्रचारासाठी काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांची जाहीर सभा रविवार दि. 30 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10:30 वाजता श्री मलप्रभा क्रीडांगणावर आयोजित करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. अंजलीताई निंबाळकर व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
यासंदर्भात प्रियंका गांधी यांचे सिक्यूरिटी ऑफीसर व त्यांचा स्टाफ दिल्लीवरून खानापूरात पोहचला आहे, प्रियांका गांधी यांच्या सिक्युरिटी ऑफीसर सोबत आमदार डॉ. अंजलीताईं निंबाळकर यांनी मलप्रभा ग्राऊंडवर जाऊन सभेच्या ठिकाणाचा आढावा घेतला.