लोंढा: खानापूर विधानसभा मतदारसंघातील निधर्मी जनता दलाचे अधिकृत उमेदवार नासिर बागवान यांचा खानापूर तालुक्यात जोरात प्रचार सुरू आहे. शुक्रवारी लोंढा येथे त्यांचा भव्य रोड शो झाला. तसेच यानिमित्ताने लोंढा विभागातील पक्ष कार्यालयाचे उद्घाटन हे यावेळी करण्यात आले.
त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात येतील मुख्य रस्त्यावर पक्ष कार्यालयाचे उद्घाटन करून या ठिकाणी सभा घेण्यात आली. या कार्यक्रमात नुकताच निधर्मी जनता दलामध्ये प्रवेश केलेले कर्वेचे नेते दशरथ बनोशी, युवा नेते अलीम अख्तर नाईक, माजी जिल्हा पंचायत सदस्य मुगुट धारवाडी, युवा नेते परसराम मादार, उपस्थित होते.
यावेळी लोंढा भागातील शेकडो कार्यकर्त्यांनी निधर्मी जनता दलामध्ये प्रवेश केला त्या सर्वांचे स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना दशरथ बनोशी यानी भाजप व काँग्रेस हे दोन्ही पक्ष भ्रष्ट आहेत. त्यांच्या नीतिमत्तेवर कधीही जनतेने विश्वास ठेवू नये कुपोषित समाजाला त्या दोन्ही पक्षांनी कधी मोठे केले नाही. भाजप आणि काँग्रेसमध्ये भ्रष्टाचारी नेत्यांनाच वाव दिला जातो यासाठी अशा पक्षाच्या पाठीमागे राहण्यापेक्षा बागवान सारख्या एक खंबीर नेतृत्व व कुमार स्वामी सारख्या कुशल नेतृत्व असलेल्या माजी मुख्यमंत्री यांच्या पाठीशी राहून खानापूर तालुक्यात बागवान यांना निवडून आणावे असे आवाहन केले. यावेळी नासिर भगवान यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले त्यानंतर लोंढा गावातून तब्बल तासभर हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भव्य रॅली काढण्यात आली. यामध्ये लोंडा परिसरातील अनेक नागरिक व लोंडां गावातील अनेक मतदार सर्व जातीय धर्मातील लोक बहुसंख्येने उपस्थित होते.