चोर्ला: खानापूर तालुक्याच्या राजकारणात कणकुंबी विभागातील जनता नेहमी योग्य व्यक्तीच्या पाठीमागे राहिली आहे. गेल्या दहा,पंधरा वर्षात कणकुंबी भागात भारतीय जनता पार्टीच्या सक्रिय कार्यकर्त्यांनी पक्षाशी जोडण्याचे काम केले. कणकुंबी भागातील अनेक युवक आज गोवा सारख्या ठिकाणी व्यवसायानिमित्त राहतात. भारतीय जनता पार्टीच्या तेथील सरकारने केलेली कामे त्या सर्वांना ज्ञात आहे. त्यामुळे भागातील अनेक खेड्यातील लोकांना भारतीय जनता पार्टीच्या कार्याची दखल घेऊन आजपर्यंत भाजपच्या पाठीशी नेहमी राहण्याचे काम केले. त्यामुळे आगामी निवडणुकीतही या भागातील जनता नेहमी भाजपच्या पाठीशी राहील यात शंका नाही. खानापूर तालुक्यातील अनेक जाणते भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ कार्यकर्ते एकजूट होऊन आज पक्षाची ताकद वाढली आहे.
त्यामुळे येत्या 10 तारखेला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत या भागातील जनता भाजपच्या पाठीशी कायम राहील असा ठाम विश्वास माजी आमदार अरविंद पाटील यांनी व्यक्त केला. आज कणकुंबी ता.खानापूर येथे भारतीय जनता पार्टी खानापूर मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार मा. विठ्ठल.सो.हलगेकर यांची प्रचार सभा मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी ते कार्यकर्त्यांना उद्देशून बोलत होते. येथील माऊली मंदिरात देवीचे दर्शन घेऊन गावातून पदयात्रा काढण्यात आली व जागृती करण्यात आली.
त्यानंतर कोपरा बैठकीत बोलताना भाजपा उमेदवार विठ्ठल हलगेकर म्हणाले कणकुंबी भागाच्या विकासासाठी आपले योगदान नेहमी राहणार आहे या भागातील अनेक लोकांनी भारतीय जनता पार्टीची जोडले गेले आहेत अशा युवकांनी भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय व राज्य पातळीवरील डबल इंजिन सरकारच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावी व येत्या 10 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत भाजपच्या पाठीशी राहून तुमचा प्रतिनिधी विधानसभेत पाठवावा असे आवाहन करून भाजपच्या नेत्यांच्या एकसंघतेमुळे व कार्यकर्त्यांच्या विश्वासामुळे भाजपचा विजय निश्चित झालेला आहे फक्त आता मताधिक्य घेण्यासाठी प्रत्येकाने आपले भौगोल मत भाजपच्या पाठीशी ठामपणे द्यावे. आपण मला आमदार म्हणून निवडून दिला तर मी सत्ताभिलाशी राहणार नाही. या भागातील प्रत्येक कार्यकर्ता हा आमदार म्हणून काम करेल व सर्वसामान्यांची कामे करण्यासाठी कार्यतत्पर राहतील हा असा ठाम विश्वास त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे नेते,माजी आम.अरविंद पाटील सौ.धनश्रीताई सरदेसाई,रमेश पाटील, संजय कुबलजी, प्रमोद कोचेरी,पंडित ओगले,नामदेव केरकर,लक्ष्मण बामणे,नारायण कालमकर व प्रमुख पदाधिकारी,कणकुंबी गावातील महिला कार्यकर्ते व गावातील जेष्ट नागरिक उपस्थित होते.