खानापूर प्रतिनिधी:
खानापूर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार श्रीमान विठ्ठलराव सोमाना हलगेकर यांच्या प्रचारार्थ केंद्रीय महिला आणि बाल विकास खात्याच्या मंत्री स्मृती इराणी यांची जाहीर सभा उद्या गुरुवार दि. 27 रोजी सकाळी 11 वाजता शांतिनिकेतन शाळेच्या मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. श्रीमान विठ्ठल हलगेकर यांच्या तालुक्यातील प्रचाराला जोरात सुरुवात झाली असून कालच बिडी येथे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांची भव्य रोडशो झाला. त्यानंतर उद्या 27 एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता शांतिनिकेतन शाळेच्या मैदानावर ही भव्य जाहीर सभा होणार असून या सभेला खानापूर तालुक्यातील तमाम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी विशेष करून महिला भगिनींनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष संजय कुबल व अधिकृत उमेदवार विठ्ठल हलगेकर यांनी केले आहे.