खानापूर: माजी मंत्री व कित्तूरचे माजी आमदार डी. बी. इनामदार (वय ७४) यांचे आज मंगळवार दि. २५ रोजी निधन झाले. दीर्घकाळापासून फुफ्फुस आणि यकृत समस्यांनी ते त्रस्त होते. त्यांच्यावर बेंगळूरच्या मणिपाल इस्पितळात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचे आज निधन झाले
उद्या बुधवार दि. २६ रोजी दुपारी २ वाजता त्यांचे मुळ गाव नेगिनहाळ येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. इनामदार हे राजकारणातील एक प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून परिचित होते. ५ वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी आमदारकीच्या काळात अनेक वेळा मंत्रिपदे मिळवली होती. त्यामुळे राजकारणात त्यांचा चांगला दबदबा होता. एम.के. हुबळी राणी शुगर कारखान्याचे चेअरमन म्हणून त्यांनी अनेक वेळा सुबद काम केले होते. राणी शुगर कारखान्याच्या माध्यमातून खानापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची त्यांचा कनिष्ठ संबंध होता. त्यामुळे खानापूरच्या राजकारणा ही त्यांची चांगलीच नाळ होती. त्यांच्या दुःखद निधनामुळे त्यांच्या कुटुंबात तसेच काँग्रेस व हितचिंतकात हळहळ व्यक्त होत आहे.