खानापुरा : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खानापूर तालुक्यात हाती घेण्यात आलेल्या चोरटी दारू व्यवसाय मटका व गांजा विक्री नंदगड व काला खानापूर पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे गेल्या महिन्याभरात अनेक ठिकाणी छापे टाकून चोरट्या व्यवहारावर आळा घालण्याचा प्रयत्न हाती घेतला आहे. शुक्रवारी चोरला जांबोटी रस्त्यावर तब्बल 216 लिटर गोवा बनावटीची दारू तर नंदगड जवळील बिडी येथे 90 लिटर बेकादेशीर दारू जप्त करून आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
तालुक्यातील जांबोटी-चोर्ला महामार्गावर अवैध दारू विक्री करणाऱ्या वाहनावर छापा टाकून महाराष्ट्र बीड जिल्ह्यातील गोरक्षनाथ नवनाथ पन्नालाल (वय ३२) आणि सुरेश गोरख मोघे (वय ३०) यांना अटक करण्यात आली. असून त्यांच्याकडून 180 दारूच्या बाटल्या (216लिटर) दारू जप्त केली व वाहतूकीसाठी वापरलेले 4 लाखाचे चार चाकी वहाण जप्त केले,
कणकुंबी चेक पोस्ट नाक्यावर गस्त घालत असताना, एम एच 46 पी 48 82 हे वाहन जांबोटीकडे जात असताना सदर वाहनाची झडती घेतली असता 180 दारूच्या बाटल्या त्याची किंमत वीस 20520 रू व 4 लाखाचे वाहन जप्त करण्यात आले,
नंदगड पोलिसांची कारवाई : अवैध सराईत विक्रेत्याला अटक, दारू जप्त
31 रोजी दुपारी पोलीस स्टेशन नंदागड अंतर्गत असलेल्या बिडी गावातील मदरशाजवळ सार्वजनिक ठिकाणी सक्षम प्राधिकाऱ्याकडून कोणताही पास, परमिट किंवा परवाना न घेता बेकायदेशीररीत्या 90 मिलीलीटर सराईने भरलेले टेट्रा सॅशेस ठेवले होते. त्यावर बेकायदेशीरपणे एएसआय एच. श्रीनिवासन, श्री. बसवराज बी लमाणी, पीआय नंदगड यांच्या मार्गदर्शनाखाली नंदागड पोलीस कर्मचाऱ्यांनी छापा टाकून आरोपींकडून हायवर्ड चीरा व्हिस्की कंपनीच्या 90 एमएलच्या सराईत भरलेल्या 65 टेट्रा बॅग जप्त करून सदर आरोपिला अटक केली आहे.