देवलती : खानापूर-पारीश्वाड रस्त्यावर तोपिनकट्टी गावातून विटा भरून घेऊन जात असलेल्या टेम्पो क्रमांक के एल 59 – 74 49 टेम्पोला अपघात होऊन सदर अपघातात वीट कामगार इब्राहिम फैयाज मुन्नोळी (वय 27 वर्षे) राहणार देवलती ता खानापूर, याचा जागीच मृत्यू झाला तर ड्रायव्हर महीबूब राजेसाब सनदी यांने अपघाताची कल्पना येतात उडी मारल्याने तो थोडक्यात बचावला आहे तसेच आणखी एक मंजू (वय वर्षे 26) नावाच्या कामगाराला किरकोळ दुखापत झाली असल्याने त्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. खानापूर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शल्यचिकित्सेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणून पुढील तपास सुरू केला आहे