IMG-20230329-WA0154

खानापुर: कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच झोपी झालेले प्रशासनही आता जागे झाले आहे. निवडणूक आचारसंहितेला प्रारंभ होता क्षणीच मंगळवारी दुपारपासून आचारसंहितेच्या नियमावलीचे पालन करत कामाला लागले आहेत. खानापूर तालुक्यात निवडणूक आचारसंहिता जारी होताच खानापूर शहरातील होल्डिंग, भिंती पत्रके हटवण्यास सुरुवात झाली आहे. नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी दुपारपासून खानापूर शहर परिसरात असलेले सर्व राजकीय प्रसिद्धीचे होल्डिंग बॅनर्स भिंती पत्रके काढण्यास प्रारंभ केला. गवत नगरपंचायतीने मुख्याधिकारी आर. के. वडार यांच्या नेतृत्वाखाली प्रेमानंद नाईक शानुर गुडलार यांच्या मार्गदर्शनाखाली तीन टीम्स करून खानापूर शहर परिसरात असलेले जवळपास 40 पोस्टर्स बॅनर्स हटवले आहेत.

भा

त्यामुळे गेल्या सहा महिन्यापासून खानापूर शहर परिसरात झळकत असलेल्या होल्डिंग,बॅनर्स आता पडद्याआड होणार आहेत. खानापूर शहर परिसरातील चौका चौकात गेल्या सहा महिन्यापासून प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या अनेक राजकीय लोकप्रतिनिधींनी सर्वत्र बॅनर एके बॅनर बाजी केली होती. पण आता निवडणुकीची आचारसंहिता जारी होताच ते हटवण्यास प्रारंभ झाला आहे.

त्यामुळे बॅनरच्या कसाड्यात अडकलेल्या चौकातील जागानी आता मोकळा श्वास सोडला आहे.
खानापूर तालुका निवडणूक आयोगाने नियमावलींचे घोडे चालवण्याचा प्रारंभ केला आहे. पोलीस प्रशासनही खडबडून जागे झाले आहे. पोलीस प्रशासनाने नेहमीप्रमाणे निवडणूक आचारसंहिता लागू होताच बंदुका, शस्त्रे पोलीस स्थानकात जमा करण्याचे आवाहन खानापूर तसेच नंदगड पोलीस निरीक्षकांनी केले आहे . ज्या शेतकरी उद्योजकांच्याकडे बंदूक, रिवाल्वर अथवा शस्त्रास्त्रे आहेत. त्यांनी तातडीने जवळच्या पोलिस स्थानकात जमा करावे यासाठी गावागावात फर्मान सोडले आहे.
अबकारी खाते अलर्ट, मद्यपी गुल?
निवडणुकीचे बिगुल वाजण्याचे संकेत मिळताच गेल्या पंधरा दिवसांपासून अबकारी खाते, पोलीस प्रशासन व तहसीलदार कार्यालयाने ठिकठिकाणी पथकांची निर्मिती करून अवैध धंद्यावर नाकेबंदी केली आहे. खानापूर तालुक्यात चार ठिकाणी चेकपोस्ट नाके स्थापन करण्यात आले आहेत. गोवा बनावटीची अथवा देशी दारू तसेच बेकायदेशीर रक्कम वाहतुकीवर करडी नजर ठेवली आहे त्यामुळे गोवा भागातून येणाऱ्या प्रत्येक वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.गोवा भागातून मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची दारू आवक होण्याची शक्यता असल्याने नाकेबंदी हाती घेऊन कारवाईना ही प्रारंभ केला आहे. गेल्या पंधरावड्यात जवळपास 15 ते 20 ठिकाणी चोरटी दारू, गांजा विक्री, मटका, आधी बाबीवर कटाक्षाने लक्ष देऊन कारवाईला प्रारंभ केला आहे.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us