
दिल्ली : गेल्या सहा महिन्यापासून वेध लागलेल्या कर्नाटक विधानसभेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले आहे. मंगळवारी दिल्ली विज्ञान भवन येथे निवडणूक आयुक्त राजीव कुमार यानी पत्रकार परिषदेमध्ये कर्नाटक विधानसभेची निवडणूक येथे 10 मे रोजी होणार असल्याची घोषणा केली आहे. या अनुषंगाने आचार संहिता लागू करण्यात आली असून निवडणूक प्रक्रिया 13 एप्रिल पासून हाती घेण्यात आली आहे. यानुसार निवडणुकीचे वेळापत्रक असे राहणार आहे.अर्ज भरण्याची अंतिम तारीख 20 एप्रिल राहणार आहे तर अर्ज मागे घेण्याची तारीख 24 एप्रिल राहणार आहे. 10 मे 2023 रोजी कर्नाटक विधानसभेची निवडणूक होणार आहे. निवडणूक नंतर तीन दिवसांनी म्हणजे 13 मे रोजी निवडणुकीचा निकाल होणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाचे निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी या पत्रकार परिषदेद्वारे केली आहे.