IMG_20230326_213034

संपादकीय:
येत्या मे महिन्यात कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने अद्याप निवडणुकीचे वेळापत्रक घोषित केले नसले तरी खानापूर तालुक्यामध्ये भाजपची उमेदवारी नेमकी कुणाला मिळणार? प्रभावी व्यक्तिमत्व कोण? असा प्रश्न सर्वसामान्य मतदारांच्या मध्ये निर्माण झाला आहे. खानापूर तालुक्याच्या राजकीय पटलावर काँग्रेस व निधर्मी जनता दलाची उमेदवारी जवळपास जाहीर झाली आहे महाराष्ट् एकीकरण समितीतून सात जण इच्छुक आहेत. पण सर्वात अधिक लक्ष लागले आहे ते भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडीकडे.
सद्य परिस्थितीत खानापूर तालुक्यात भारतीय जनता पार्टी संघटना मजबूत आहे. त्यामुळे पक्षांमध्ये खानापूर तालुक्यातील स्थानिक अनेक जण इच्छुक आहेत. पक्ष संघटना बांधणीत तालुकास्तरीय नेत्यासह तळागाळातील कार्यकर्ते जोमाने कामाला लागले. खानापूर तालुका बाहेरील इच्छुकाना उमेदवारी देऊ नये असा हट्टाहास स्थानिक भाजप कार्यकर्त्यांसह नेत्यांनी केला आहे. हे जरी खरे असले तरी तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, माजी आमदार अरविंद पाटील, महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल हलगेकर,भाजपा महिला नेत्या धनश्री सरदेसाई यांची नावे अग्रेसर आहेत. सर्वजन आपल्या परीने उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत.


श्रीमान विठ्ठल हलगेकर यांचे नाव आघाडीवर?

खानापूर तालुक्यात भारतीय जनता पार्टीत प्रामुख्याने महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल हलगेकर यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे. खानापूर तालुक्यात भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार श्री विठ्ठल हलगेकर 2018 मध्येच जवळजवळ निवडून आले होतेच. पण पक्षातीलच काही बंडाळीमुळे हार पत्करावी लागली. केवळ 3 हजार मतांनी त्यांना पराभव सोसावा लागला.पण निवडणुकीत झालेला पराभव मागे ठेवून श्री विठ्ठल हलगेकर यांनी गेल्या पाच वर्षात आपले काम कायम ठेवले आहे. यासंदर्भात भाजप पक्षश्रेष्ठींनी अनेक वेळा चिंतन बैठकही केली आहे. यापूर्वीच्या अनेक निवडणुकांचा परामर्श घेता निसटता पराभव झालेल्या उमेदवारांनाच पुन्हा पुन्हा उमेदवारी आली आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे माजी आमदार स्वर्गीय प्रल्हाद रेमानी होय, त्यांना पुन्हा पुन्हा तीन वेळा पक्षाने उमेदवारी दिली होती.त्याच पार्श्वभूमीवर हलगेकर यांचे नाव प्रथमस्थानी असल्याचे चर्चेत आहे.

शिवाय सहकार क्षेत्र शैक्षणिक क्षेत्र याबरोबर शेतकऱ्यांच्या हितार्थ लैला साखर कारखान्याची यशस्वी धुरा सांभाळत खानापूर तालुक्यात एक कर्तव्यदक्ष नेतृत्व म्हणून त्यांनी स्वतःला झोकून दिले आहे. शिक्षकी सेवा बजावता बजावता राजकारणातही त्यांनी मुसंडी मारली आहे. आता ते सेवानिवृत्तीनंतर राजकारणात पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. मागील निवडणुकीत त्यांच्या झालेल्या पराभवामुळे त्यांच्या कर्तबगारीवर सर्वसामान्य माणसात आपुलकी वाढली आहे. पुन्हा एकदा विठ्ठल हलगेकर यांनाच जनतेने पसंती देण्याचा विडा उचलला असून खानापूर तालुक्यात विठ्ठल हलगेकर यांनाच उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होताना दिसत आहे.
मागील निवडणुकीत विठ्ठल हलगेकर यांना स्वकीयनाच समाधान करण्यात वेळ घालावा लागला.त्यामुळे निसटता पराभव पत्करावा लागला. पण आता हलगेकर यांनी साम, दाम, दंड लावून तालुक्यात एक वेगळीच छाप टाकली आहे. भारतीय जनता पार्टीच्या कार्याबरोबर महालक्ष्मी ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी सर्वतोपरी कार्यतत्व राहिले आहेत. गरिबीतूनवर आलेल्या विठ्ठल हलगेकर हे यानी लोकांशी अतिशय गोड मैत्री जपली आहे. निस्वार्थपणे दोन रुपयाच्या फंडातून चारशे रुपये पर्यंत चा निधी उभारून एक उत्कृष्ट अशी महालक्ष्मी संस्था उभारणे तेवढे सोपे नाही. पण ते काम विठ्ठल हलगेकर यांनी करून दाखवले आहे. शिवाय लैला साखर कारखाना सुरू करण्याचे धाडस हे शेतकऱ्यांच्या हिताचे झाल्याने सर्वसामान्य शेतकरी वर्गाने ही विठ्ठल हलगेकर यांच्याच नावाला पसंती दर्शवली आहे. विठ्ठल हलगेकर म्हणजे ज्याला लोकांच्या कष्ट, सुखाची जाण आहे. साधे राहणे व परोपकारी चिंतन. विश्व निर्माण करण्याची क्षमता. तालुक्यात औद्योगिक क्षेत्र विकसित करण्याचे मानस. शेतकऱ्यांना समृद्ध शेती करण्यासाठी आधुनिकता व पाणी योजना. तालुक्यातील रस्ते वीज पाणी समस्या यावर भर देण्याचे चिंतन, मंदिरांचा विकास, दिन दलितांना रोजगार देण्यासाठी विशेष प्रयत्न याचा मानस. तालुक्यातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी कार्यकर्त्यांच्या खांद्यावर देणार जबाबदारी शेकडो बेरोजगार युवकांना नोकरी मिळवून देण्याचा मानस अशा अनेक योजना मार्गी लावण्यासाठी त्यांनी आतापासूनच प्लॅन हाती घेतले आहे. मागील निवडणुकीतील निसटता पराभव लक्षात घेता पक्षश्रेष्ठीही नक्कीच त्यांच्या उमेदवारीचा विचार करतील यात शंकाच नाही. सद्य परिस्थितीत खानापूर तालुक्यात ते एक तगडे उमेदवार म्हणून परिचित आहेत. मागील वेळेपेक्षा त्यांची आरोग्य परिस्थिती ही उत्तम आहे . यावेळी ते काहीही झाले तरी जिंकणारच या आशेने निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरले आहेत. खानापूर तालुक्याच्या राजकारणात ते अनेक दशकांपासून सक्रिय असून अनेक लोकांचे समर्थन व प्रेम त्यांना लाभले आहे. खानापूर विधानसभा मतदार संघाचा आमदार या नात्याने जनतेची सेवा करण्याची इच्छा असून आगामी विधानसभा निवडणूक जिंकून मतदार संघातील जनतेची सेवा करण्याचे त्यांचे स्वप्न आहे. पक्षाच्या तालुका स्तरापासून ते राज्य आणि राष्ट्रीय स्तरापर्यंतच्या सर्व नेत्यांशी त्यांचा जवळचा संबंध आहे.त्यामुळे भाजपची उमेदवारी त्यांनाच मिळेल अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.

माजी आमदार अरविंद पाटील तगडे व्यक्तिमत्व

खानापूर तालुक्याच्या राजकीय पटलावर प्रामुख्याने नाव समोर येते ते माजी आमदार अरविंद पाटील यांचे होय.  महाराष्ट्र एकीकरण समितीतून 2013 मध्ये आमदार झाले. पण 2018 च्या निवडणुकीत समितीत बेंदीलकी निर्माण झाल्याने त्यांना 26000 मतावर थांबावे लागले. पण  राजकीय पटलावरील बदलते वातावरण लक्षात घेता भाजपात प्रवेश करून भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांचे अथक परिश्रम आहेत. राजकारणातील एक प्रभावी व्यक्तिमत्व व जिल्हा बँकेच्या माध्यमातून त्यांनी बेळगाव जिल्ह्याच्या राजकीय पटलावर आपली वेगळी छाप ठेवल्याने भाजपच्या उमेदवारीसाठी त्यांनी आपली ताकद पणाला लावली आहे. संकटकाळी धावून जाणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. भाजपातून उमेदवारी मिळाल्यास समितीतील त्यांचे चाहते त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार यात शंका नाही.

महिला प्रभावी नेत्या धनश्री सरदेसाई

खानापूर भाजपातून भाजपा राज्य कार्यकारणी सदस्या धनश्री सरदेसाई यांनीही एक महिला उमेदवार म्हणून आपली वेगळी ओळख राखली आहे. तळागाळातील माणसापर्यंत पोहोचून आपणही कमी नाही यामध्ये त्या कधी मागे राहिल्या नाहीत. यापूर्वीच्या भाजपातील अनेक घडामोडीत त्यांनी मी म्हणणाऱ्यांना दिशा दिली आहे. त्यामुळे त्यांनीही उमेदवारीचा दावा करून जनसंपर्क व वरिष्ठ संपर्कात कायम आहेत. एक तालुका पंचायत सदस्य म्हणून काम करावे जिल्हा पंचायत निवडणुकीतही मोठी भागातून भाजप ची ताकद दाखवली आता तालुका पातळीवर एक सक्षम महिला नेत्या म्हणून त्या परिचित आहेत त्यामुळे त्यांनीही भाजपच्या उमेदवारीसाठी आपला दावा कायम ठेवला आहे.


निगर्वी व्यक्तिमत्व प्रमोद कोचेरी

खरंतर खानापूर भाजपात एकापेक्षा एक असे अनेक प्रभावी व्यक्ती आज भाजपच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. त्यामध्ये गेल्या 30 वर्षापासून खानापूर तालुक्यात भाजपा संघटना मजबूत करून हाती मिळेल ते काम पूर्ण करण्याची ताकद निर्माण करणारे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांचीही नाव कमी नाही. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ ऐसे होण्यास वेळ नाही असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. यामध्ये प्रमोद कोचेरी नक्कीच पुढे राहतील यात शंका नाही. वरिष्ठापासून तालुक्यातील दुभाषिक व्यक्तिमत्व व सर्वांच्या कामात झोपून काम करणारे व दानशूर व्यक्तिमत्व असल्याने त्यांचेही नाव वरिष्ठापर्यंत आहे. त्यामुळे त्यांनाही ऐनवेळी उमेदवारी मिळेल अशी शक्यता वर्तवली तर वावगे ठरणार नाही.


भाजपा अध्यक्ष संजय कुबल

खर तर खानापूर तालुक्यामध्ये भाजप म्हटलंतर प्रामुख्याने नाव येते ते संजय कुबल यांचे. वयाच्या चौदाव्या वर्षापासून भाजपच्या राजकारणात स्वतःला झोकून एक मुरब्बी राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. पदाची हवस नसली तरी कामाची हवस व संघटनात्मक बांधणीसाठी असणारी तळमळ त्यांच्यामध्ये आहे. त्यामुळे वरिष्ठांच्या मनातही संजय कुबल यांचे नाव भाजपचा सच्चा कार्यकर्ता म्हणून परिचित आहे.त्यामुळे भाजपच्या व संघाच्या धोरणातून जाणाऱ्या नेहमी संजय कुबल नक्कीच मागे राहणार नाहीत यात शंका नाही. याशिवाय खानापूर भाजपातून गेल्या अनेक वर्षापासून झटणारे माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबुराव देसाई यांनीही सोप्या पद्धतीने आपले प्रयत्न कायम मार्गी ठेवले आहेत. याशिवाय अनेक जण या उमेदवारीच्या पंगतीत आहेत.

एकूणच खानापूर तालुक्यात असे अनेक मातब्बर नेते भाजपच्या उमेदवारासाठी प्रयत्नशील आहेत. शिवाय भाजप नेत्या डॉ.सोनाली सरनोबत यांनीही खानापूर तालुक्यातून उमेदवारीसाठी आपली ताकद पणाला लावली असून दौरे हाती घेतले एकूणच या एकूण चढाओढीत भाजपची उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बेळगाव जिल्ह्यात खानापूर तालुका भाजपाने या वेळेला संघटनात्मक केले आहे. त्यामुळे खानापुरात भाजपचा तगडाच उमेदवार पक्षश्रेष्ठ देतील यात शंका नाही.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us