चापगाव: विज्ञान आणि तंत्रज्ञानाची कास धरल्यास प्रगतीची फळे चाखता येतात. त्यासाठी विद्यार्थ्यांनी चिकित्सवृती आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन बाळगणे आवश्यक आहे. परीक्षेत किती गुण मिळाले यापेक्षा किती कौशल्ये आत्मसात करता आली. यावर यशाचे मोजमाप होणे आवश्यक आहे. केवळ परीक्षेसाठी न शिकता जीवनाच्या कसोटीत यशस्वी होण्यासाठी ज्ञानार्जन करा. शिक्षक आणि पालकांची स्वप्न साकार करण्यासाठी चिंतन मनन आणि वाचन याची सवय लावून घ्या. यशवंतांच्या पंगतीत बसण्याचा मान मिळाल्याशिवाय राहणार नाही. असे प्रतिपादन दै. पुढारीचे पत्रकार व युवा व्याख्याते वासुदेव चौगुले यांनी केले.
चापगाव (ता. खानापूर) येथील श्री. मलप्रभा हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा सोहळा आणि पारितोषिक वितरण कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष व जेष्ठ पत्रकार पिराजी कुऱ्हाडे होते.
प्रारंभी उपस्थित यांचे स्वागत मुख्याध्यापक व्ही. बी. होसूर यांनी करून विद्यार्थ्यांनी जीवनात कौशल्य संपन्न शिक्षण घ्यावे. आयुष्यात त्यांनी शाळेचे नाव उज्वल करत यशाचे शिखर गाठावे असे सांगितले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात एकीकरण समितीचे युवानेते निरंजन सरदेसाई, चापगाव ग्रामपंचायत ग्रा. प. चे माजी अध्यक्ष रमेश धबाले, मच्छे हायस्कूलचे मुख्याध्यापक शिवाजीराव पाटील,सीआरसी मुल्ला यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. फोटो पूजन राजाराम जांबोटकर मारुती पाटील नारायण जांबोटकर आदींच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना निरंजन सरदेसाई यांनी जीवन हे अनमोल आहे. आई-वडिलांनी व शिक्षकांनी दिलेले संस्कार हे उभ्या जीवनात आपणाला दिशा देण्याचे कार्य करते आई,वडील हे पहिले गुरु, शिक्षक दुसरे गुरु तर जीवनात शिक्षण घेताना घेतलेला अनुभव हा तुमचा तिसरा गुरु आहे. यासाठी जीवनात काय करावे, काय करू नये हे तुम्ही ज्ञानांकित झाल्यानंतर ठरवायचे आहे. मनुष्य हा जीवनात कधीच हारलेला नाही,कर्तृत्व व जिद्द, कटाक्ष ही जीवनात अत्यंत महत्त्वाची आहे. अनेक वेळा प्रयत्न करून यशाच्या शिखरावर गाठणारी माणसे आपण इतिहास काळापासून ऐकिवात आहोत. अशाच पद्धतीने दहावी परीक्षेत उच्चांक साधण्यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न करा. हार न मानता प्रयत्नना यशाची कास बनवून सतत कार्यरत राहिल्यास जीवन हे समृद्ध सुखी व्हायला वेळ लागत नाही. असे मार्मिक विचार त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडले.
यावेळी प्रमुख वक्ते या नात्याने बोलताना मच्छे हायस्कूलचे मुख्याध्यापक शिवाजीराव पाटील यांनी कासव आणि ससा याचे उदाहरण देऊन जीवनात चाणाक्ष बनवून आपल्या बुद्धिमत्तेचा वापर केला तर तो नक्कीच पुढे जाऊ शकतो. असे त्यांनी सांगितले
शाळेचे माजी विद्यार्थी,अभियंते नागेंद्र पाटील म्हणाले, जीवन समृद्ध आणि सुखी बनवण्यासाठी उच्च शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी दहावीचा टप्पा अत्यंत महत्त्वाचा असून येथूनच आपल्या उभ्या जीवनाची दिशा ठरवता येते. हार न म्हणता येणाऱ्या प्रसंगाला सामोरे जाऊन मी जिंकणारच असा भाव प्रत्येक विद्यार्थ्यांनी ठेवावा असे मार्गदर्शन त्यांनी केले ग्रामपंचायत माजी अध्यक्ष रमेश धबाले यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून उज्वल भविष्य घडवण्यासाठी उत्तम शिक्षणाची गरज व मायबोली टिकवण्यासाठी मातृभाषेत शिक्षण घेण्याची काळाची गरज असल्याचे विचार त्यांनी मांडले. शाळेचे मुख्याध्यापक पिराजी पाखरे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना पिराजी कुऱ्हाडे यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन आपल्या शिक्षक पालक यांचा आदर राखावा व शाळेचे नाव उज्वल करावे, भविष्यात उच्च शिक्षण घेताना आपली योग्य दिशा ठरवावी असे आवाहन केले.
आदर्श विद्यार्थ्यांची निवड
आर्यन दौलतकर आदर्श विद्यार्थी तर आदर्श विद्यार्थिनी म्हणून वैष्णवी सुतार यांची निवड