खानापूर पोलिसांनी अवैध धंद्यावर जोरदार मोहीम हाती घेतली आहे. यानुसार रविवारी सायंकाळी खानापूर तालुक्यातील तीर्थकुंड्ये गावाजवळ स्वामी हॉटेल नजीक गावठी दारू विक्री करताना पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
याबाबत मिळालेली माहिती की, खानापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या तीर्थकुंडये गावांनजीक असलेल्या स्वामी हॉटेल जवळ एक व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीर गावठी दारू विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानुसार खानापूर पोलीस ठाण्याच्या पथकान डी.एस.पी. बैलहोंगल यांच्या मार्गदर्शनाखाली खानापूरचे पोलीस निरीक्षक रामचंद्र नाईक , यांच्या मार्गदर्शनाखाली उप पोलीस निरीक्षक प्रकाश राठोड यांच्या खानापूर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी छापा टाकून आरोपींनी ठेवलेली 15 लिटर गावठी दारू जप्त केली . पोलिसांचा सुगावा लागताच आरोपीने तिथून पलायन केल्याचे कळते, पोलीस आरोपीच्या शोधात आहेत. संशयित आरोपीवर खानापूर पोलीस ठाण्यात गुन्हा आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याकामी हवालदार जयराम हम्मनावर, के एन बडगेर, काद्रोळी, के एम सनदी, जैनपगोल, मुसळी, बंगी आदींनीही कारवाई केली आहे.