खानापुर: खानापूर तालुक्यात गेल्या 15 दिवसात पोलिसांनी अवैध धंद्यावर कडक कारवाई मोहीम हाती घेतली. अनेक ठिकाणी गांजा विक्री प्रकरणी छापे टाकून कारवाई केली. गेल्या दोन दिवसांपूर्वी जांबोटी क्रॉस तसेच रुमेवाडी क्रॉस जवळ देखील मटका खेळणाऱ्यांच्यावर कारवाई केली असतानाच पुन्हा रविवारी दि. १९ रोजी सायंकाळी पारिश्वाड नजीक मलप्रभा नदीकाठावर ८ जण अंदरबाहर जुगार खेळत असल्याची माहिती मिळताच बैलहोंगल डीएसपी रवी नायक यांच्या मार्गदर्शनाखाली खानापूर पोलिस स्थानकाचे सीपीआय रामचंद्र नाईक, पीएसआय प्रकाश राठोड व सहकाऱ्यांच्या मदतीने छापा टाकून जुगार खेळण्याचे पत्ते (कार्डे) तसेच रोख रक्कम १९५०० रूपये जप्त करून कर्नाटक पोलिसांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलिस पुढील तपास करत आहेत. अटक करण्यात आलेले इमाम तालिकोटी (पारिश्वाड), सब्बीर बसीरकट्टी (पारिश्वाड), मुक्ताकसाब नदाफ (एम के हुबळी), शिवानंद शिरकोला (एम के हुबळी), संतोष हिरेमठ (पारिश्वाड), महमद बसीरकट्टी (पारिश्वाड), सिकंदर दास्तीकोप (हिरेहट्टीहोळी), मलिकार्जून सम्मणावर (एम के हुबळी) तालुका खानापूर आदीना अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या या कारवाईबद्दल सर्वसामान्यातून समाधान व्यक्त होत आहे.