खानापूर: खानापूर तालुक्यात सहकारी क्षेत्राचे जाळे विस्तारात एक सर्वसामान्य व्यक्तिमत्व तळागाळातील शेतकरी समाजापर्यंत पोहोचवून त्यांच्या समस्या व व्यथा जाणून घेण्यासाठी नेहमी कार्य तत्पर आहे. तोपिनकट्टी श्री महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल हलगेकर सारख्या खंबीर नेतृत्वाने सहकार क्षेत्राचा इतका वटवृक्ष मोठा केला आहे. आज लैला साखर कारखाना चालवण्याची मोठी जबाबदारी घेऊन आज शेतकऱ्यांची ऊस बिले वेळेवर देणे, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम नेहमी हाती घेतले आहे. 2018 च्या निवडणुकीत विठ्ठल हलगेकर यांनी थोड्याफार फरकाला पराभवाला सामोरे जावे लागले. परंतु ते आपल्या कर्तव्याला आणि कर्तुत्वाला मागे न राहता जनमाणसात कायम राहून जनतेची सेवा करण्याचे काम त्यांनी केले आहे. पक्षातीलच काही मतभेदामुळे त्यांना थोड्याफार मताने पराभव करावा लागला, आता आगामी निवडणुकीत अशा सक्षम व प्रबळ नेतृत्वाला भाजपाच्या वरिष्ठांनी पुन्हा एकदा संधी देणे हे त्यांचे कर्तव्य असून यासाठी आपणही कार्य तत्पर राहणार असल्याचे विचार राष्ट्रीय किसान मोर्चा भाजपाचे उपाध्यक्ष व भाजपचे वरिष्ठ नेते श्रीयुत शंकरगौडा पाटील यांनी बोलताना व्यक्त केले.
यावेळी ते पुढे राजकारणाविषयी बोलताना म्हणाले, अलीकडच्या काळात राजकारण हे विकोपाला गेलेले कारण आहे. पैसा, लालसा, आकांक्षा या गोष्टी राजकारणात बाहेर पडत आहेत.एकेकाळी चिरमुरे, भाकरी खाऊन लोकप्रतिनिधी निवडून आणण्यासाठी अनेकांनी कार्य केले आहे. निवडणुका आपणही लढवल्या, थोड्याफार फरकाने हरताना त्या उमेदवाराची काय घालमेल होते हे आपण ही पाहिले आहे. मागील निवडणुकीत केवळ साडेतीन हजार मताने हलगेकरांचा पराभव झाला हा वर्मी लागणारा होता. त्यामुळे येत्या निवडणुकीत पुन्हा त्यांचाच विचार होणे हे क्रमपात्र असून भाजप वरिष्ठांनी याची जबाबदारी घेणे अनिवार्य ठरेल. असे त्यांनी ठामपणे सांगितले.
खानापूर लैला शुगर साखर कारखान्याच्या वतीने गळीत हंगामाचा सांगता समारंभाच्या निमित्ताने शेतकरी मेळावा तसेच महालक्ष्मी ग्रुपच्या वतीने नव्याने सुरुवात करण्यात येत असलेल्या श्री महालक्ष्मी फार्मर्स प्रोडूसर को ऑफ ऑर्गनायझेशन सोसायटीच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लैला साखर कारखान्याचे चेअरमन व भारतीय जनता पार्टीचे नेते श्रीमान विठ्ठल हलगेकर होते.
येथील श्री भावकेश्वरी मंदिराच्या पायथ्याशी झालेल्या कार्यक्रमात लैला साखर कारखान्याचे व्यवस्थापक सदानंद पाटील यांनी प्रास्ताविक स्वागत करुन नूतन सोसायटी विषयी बोलताना ते म्हणाले, केंद्र सरकारच्या सहकार्यातून या सोसायटीचे कामकाज चालणार असून यामध्ये साडेसातशे पेक्षा जास्त शेतकऱ्यांना भागधारक म्हणून जोडण्यात आले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या नवनवीन योजना शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव देणे, शेतकऱ्यांच्या पिकाला बाजारपेठ उपलब्ध करून देणे, शीतगृह सारख्या योजना या अंतर्गत राबवण्यात येणार असून याचा भविष्यात शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल असे ते म्हणाले.
लैला कारखाना दुसरा हप्ता 200 रुपये देणार
यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष व भाजप नेते विठ्ठल हलगेकर म्हणाले, लैला साखर कारखाना हा शेतकऱ्यांच्या विश्वास व दिलेल्या सहकार्यामुळे चालवण्यासाठी घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी आपण वेळोवेळी अनेक योजना राबवून शेतकऱ्यांना वेळेत बिले देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. तालुक्याचा कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी विश्वासाने उसाचा पुरवठा करून तब्बल तीन लाख पंधरा हजार टन यावर्षी गाळप केले आहे. पहिला हप्ता 2600 रुपये यापूर्वीच आम्ही जमा केला असून आता दुसरा हप्ता 200 रुपये देणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
सदर दुसरा हप्ता येत्या 15 एप्रिल नंतर हप्त्यातील 150 रुपये व उर्वरित 50 रुपये गणेश चतुर्थीच्या सणाच्या वेळी देणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
यावेळी राजकारणाविषयी बोलताना ते म्हणाले, 2018 च्या निवडणुकीत झालेला पराभव आम्ही वर्मी न लावता समाजापर्यंत पोहोचून शेतकरी हिता व कार्य हाती घेतले आहे. तालुक्यातील अनेक महिला भगिनी तसेच शेतकरी वर्ग आमच्या संस्थेची व कारखान्याची जोडले गेलेले आहेत. त्यामुळे राजकारणातही वेळोवेळी आपली माणसं व ताकद दाखवण्यासाठी अशा गोष्टीची गरज भासते. पण यावरही स्वकीयच काही लोक टीका करताना दिसतात. पण आगामी काळात आम्ही आमच्या शेतकरी व महिला माता-भगिनींसाठी वेगवेगळे उपक्रम राबवणार असुन लैला साखर कारखान्याला ऊस पुरवठा करणारा प्रत्येक शेतकऱ्यालाही आगामी काळात ड्रेस कोड देऊन त्यांचाही सन्मान केला जाणार असल्याचे विचार यावेळी त्यांनी व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावरून भाजप नेते किरण येळूरकर शांतीनिकेतन पि.यू कॉलेजचे चेअरमन प्रा.बंडू मजूकर, भाजप नेते सुभाष गुलशेट्टी किसान मोर्चाचे प्रकाश तीरवीर, मनोहर कदम, हनुमंत पाटील यासह महालक्ष्मी ग्रुपचे संचालक मंडळ उपस्थित होते. यावेळी जवळपास चार हजार हून अधिक शेतकरी बांधव व हितचिंतक उपस्थित होते. कार्यक्रमात प्रास्ताविक स्वागत आकाश अथणीकर यांनी केले.