IMG_20230319_081756


खानापूर: प्रतिनिधी ;

गाव स्थापन करताना किंवा एखादा व्यवसाय प्रारंभ करत असताना पूर्वीच्या काळापासून त्या व्यवस्थापनेच्या परिसरात दैवताला महत्त्व अधिक मानले जात होते. म्हणून आजतागायत दैवी शक्तीची ताकद व देवावरचा विश्वास हा कायम राहिला आहे. श्री महालक्ष्मी देवीच्या कृपाशीर्वादाने आम्ही हा महालक्ष्मी ग्रुपचा वटवृक्ष तळागाळातील लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचे धाडस केले, त्याच पद्धतीने खानापूर तालुक्यात भाग्यलक्ष्मी साखर कारखाना उभा करताना या ठिकाणी असलेल्या श्री भावकेश्वरी देवीच्या कृपाशीर्वादाने कारखान्याची निर्मिती झाली. आज ती वेगवेगळ्या स्वरूपात कार्यरत होत असताना महालक्ष्मी ग्रुपच्या ताब्यात घेऊन ती चालवण्याचे धाडस आम्ही केवळ श्री भावकेश्वरी देवीच्या कृपाशीर्वादाने केले आहे. यामुळे या लैला साखर कारखान्याचे आम्ही कोणी मालक नसून श्री भावकेश्वरी देवीच या कारखान्याची खरी मालक असल्याचे भावनिक उद्गार श्रीमान विठ्ठल हलगेकर यांनी व्यक्त केले. शनिवारी लैला साखर कारखान्याच्या बाजूला असलेल्या कुपटगिरी श्री भावकेश्वरी मंदिराच्या नूतन इमारतीचा कॉलम भरनी कार्यक्रम थाटात पार पडला यावेळी ते बोलत होते.

पूज्य श्री चन्न बसव देव रुद्रस्वामी मठ यांच्या दिव्य सानिध्यात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक कल्लाप्पा शामराव पाटील होते. प्रारंभी उपस्थिताचे स्वागत उमेश बुवाजी यांनी केले. प्रस्तावना मंदिर बांधकाम कमिटीचे अध्यक्ष शंकर पाटील यांनी करून मंदिराची पार्श्वभूमी मंदिराचा कॉलम भरणी श्री विठ्ठल सोमांना हलगेकर व त्यांच्या धर्मपत्नी सौ रुक्मिणी विठ्ठल हलगेकर यांच्या शुभहस्ते स्वामीजींच्या सानिध्यात पार पडले. कार्यक्रमात दीप प्रज्वलन विश्व हिंदू परिषदेचे उत्तर प्रांत कोषाध्यक्ष कृष्णा भट, बेळगाव जिल्हा विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष श्रीकांत कदम, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल, माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबुराव देसाई, बेळगाव येथील भाजप नेते राहुल मुचंडी, खानापूर लैला साखर कारखान्याचे एमडी सदानंद पाटील, भाजपा सेक्रेटरी गुंडू तोपिनकट्टी, भाजपा युवा नेते पंडित ओगले, उचवडे येथील भाजप नेते मारुती पाटील, भाजप नेते किरण यल्लुरळकर आदींच्या हस्ते करण्यात आले.


यावेळी बोलताना विश्व हिंदू परिषदेचे उत्तर प्रांत कोषाध्यक्ष कृष्णा भट म्हणाले, गावातील प्रत्येक मंदिरेही संस्कार केंद्र बंदी पाहिजेत. भारतीय धर्म रितीरिवाज परंपरा ही आपल्या पुढच्या पिढीला अवगत करण्यासाठी दानत अत्यंत महत्त्वाची आहे. हिंदुत्ववाद त्याग भावना आहे, आज देशाला समृद्ध बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आत्मसात केलेले गुण हे आपल्या पुढच्या प्रत्येक पिढीच्या मनात निर्माण झाले पाहिजे. यासाठी अशा मंदिरांच्या उभारणीत हा प्रत्येकाचा सिंहाचा वाटा असला तर मंदिराची उन्नती प्रगती होण्यास वेळ लागणार नाही असे सांगून या मंदिरासाठी त्यांनी स्वतःहून 51 हजार रुपयांची देणगी जाहीर केली.


यावेळी व्यासपीठावरून भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी,भाजपा तालुका अध्यक्ष संजय कुबल,किरण येळूरकर आदींनी विचार मांडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष कल्लाप्पा शामराव पाटील यांनीही मंदिराच्या उभारणीत ग्रामस्थांचे योगदान व श्रीयुत विठ्ठल हलगेकर यांनी गावाला एकत्रित करून जीर्णोद्धनाचा संकल्प हाती घेतला याबद्दल संपूर्ण गाव श्री विठ्ठल हलगेकर यांच्या पाठीशी राहून त्यांना लोकप्रतिनिधित्व देण्याबरोबर या मंदिराचेही उद्घाटन त्यांच्या आमदारकीतच व्हावे असे आवाहन करून ग्रामस्थांचा एकमुखी पाठिंबा त्यांना असल्याचे उद्गार व्यक्त केले.


यावेळी व्यासपीठावर लैला कारखान्याचे शेतकी अधिकारी बाळासाहेब शेलार, मेकॅनिक इंजिनियर अनिल पाटील, भाजप युवा नेते गजानन पाटील, तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष भरमानी पाटील, कृषी पतीने सोसायटीचे संचालक सय्यद धामनेकर, किणये ग्रामपंचायत सदस्या वर्षा डुकरे, एडवोकेट आकाश अथणीकर, राघोबा चापगावकर यासह अनेक जण उपस्थित होते. मान्यवरासह ग्रामस्थ पंच कमिटी हायस्कूल शिक्षक प्राथमिक शिक्षक ग्रामपंचायत उपाध्यक्ष, सदस्य, गावातील जेष्ठ शिक्षक, भारतीय सैनिकांचा यावेळी झालेल्या कार्यक्रमात उपस्थित त्यांचा श्रीफळ शाल देऊन सत्कार करण्यात आला.

मंदिर उभारणीला कारखान्याचा भरीव वाटा

श्री भावकेश्वरी ही कुपटगिरी गावासह कारखान्याची आराध्य देवता आहे. गावाने एकजूट होऊन या मंदिराच्या उभारणीसाठी संकल्प घेतला याचा आनंद केला, गेल्या अनेक वर्षापासूनची मंदिराच्या उभारणीची तळमळ आज पूर्णत्वाला येत आहे. त्यामुळे मंदिराच्या उभारण्यासाठी येणाऱ्या खर्चाच्या आराखड्यात 70 टक्के जबाबदारी उचलण्याची जबाबदारी लैला साखर कारखान्याचे चेअरमन श्री विठ्ठल हलगेकर यांनी घेतली आहे. त्यामुळे संपूर्ण गावाने श्रीमान विठ्ठल हलगेकर यांच्या पाठीशी राहून या मंदिराच्या उभारणीबरोबर त्यांना लोकप्रतिनिधी करण्याची ताकद ही उभी केली आहे.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us