बेळगाव ते उत्तराखंड पर्यंत तीन युवकांचा दुचाकी प्रवास
खानापूर: अलीकडच्या काळात पाणीटंचाई ही देशाची गंभीर समस्या बनणार अशी भीती सर्वत्र निर्माण झाली आहे. या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी पाणी वाचवा अभियान राबवणे गरजेचे आहे. खानापूर ‘ बेळगाव येथील तीन युवकांनी पाणी वाचवा देश वाचवा जागृती अभियान बेळगावपासून ते उत्तराखंड शिशुपर्यंत दुचाकी वरून प्रवास करून जागृती अभियानअंतर्गत जवळपास एक लाख लोकांच्या पर्यंत हा पाणी वाचवा संदेश पोहोचवण्यासाठी नऊ राज्यातून तसेच 25 शहरातून हा प्रवास हाती घेतला आहे. जवळपास 5000 किलोमीटर प्रवासात अनेक ठिकाणी हे अभियान राबवण्यासाठी त्यांनी शुक्रवारपासून प्रारंभ केला आहे. यामध्ये खानापुरातील युवा कार्यकर्ते तरुण रायका, बेळगाव येथील युवा कार्यकर्ते उमेश पवार,मंगेश तारीहाळकर यांचा समावेश आहे. त्यांच्या या उपक्रमाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.