खानापूर: खानापूर तालुक्यात गांजा विक्री करून तरुणाईला व्यसनाधीनतेत आणणाऱ्या दोघांना खानापूर पोलिसांनी जेरबंद केले आहे. गेल्या आठवड्याभरात दोन ते तीन ठिकाणी गांजा विक्री करणाऱ्यावर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.
अशाच प्रकारे शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास खानापूर रूमेवाडी क्रॉस जवळ अमली पदार्थ गांजा विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच याप्रकरणी दोघांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. खानापूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामचंद्र नाईक व सहकार्यानी बैलहोंगल डी एस पी रवी नायक याच्या मार्गदर्शनाखाली चोरून गांजा विक्री करणार याकडून 1 किलो 105 ग्रॅम वजनाचा गांजा तसेच सोबत स्कूटी के ए 22 ए एम 0913 दुचाकी जप्त करून त्याच्या वर 61/ 2023 कलम 20 बी, एन डी पी एस गुन्हा दाखल करून सदर आरोपींना न्यायालयात हजर केले आहे. पोलिसांनी गांजा विक्रीवर हाती घेतलेल्या या कारवाईबद्दल सर्वसामान्य नागरिकांतून अभिनंदन होत आहे.