खानापूर: खानापूर तालुक्याच्या राजकीय पटलावर नेहमी चर्चेत राहणारे व सध्या खानापूर तालुक्याच्या सहकार क्षेत्रातील एक प्रभावी व्यक्तिमत्व, खानापूर तालुक्यात 2012 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत 38 हजार यशाचे शिखर गाठून खानापूर तालुक्यात एक होणारी व्यक्तिमत्व म्हणून नावारूपास आलेले जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व माजी आमदार तसेच भारतीय जनता पार्टीचे नेते श्रीमान अरविंद चंद्रकांत पाटील यांचे नाव आजही तितकेच नावारूपास आलेले आहे अशा या व्यक्तिमत्त्वाचा उद्या शुक्रवार दिनांक 17 मार्च रोजी 54 वा वाढदिवस आहे.
या निमित्ताने त्यांच्याविषयी थोडक्यात.. विकासासाठी झटणारे नेतृत्व व शेतकर्यांच्या जिवणाला नवा अर्थ प्राप्त करुन देण्यासाठी हरीतक्रांतीचा नारा हाती घेऊन रात्रीचा दिवस करुन झटणारे नेते तसेच दिनदुबळ्यांचे कैवारी, युवकांचे प्रेरणास्थान माजी आमदार अरविंद चंद्रकांत पाटील दि. 17 रोजी वयाची 53 वषे पूर्ण करुन सूवर्ण महोत्सवी वर्षात म्हणजे 54 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यांच्या दूरदृष्टी लहानपणातच वडील कै.सी.बी पाटील यांच्या चांगल्या संस्कारामुळे ते आपल्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यशस्वी ठरले. घरातील चळवळीचा वसा घेत गेल्या दोन दशकापासून वर्षात त्यांनी सहकारक्षेत्रामध्ये आपले राजकीय पाऊल ठेवून राजकरणात आपली चांगली इमेज तयार केली.
2005 मध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदाचा बहुमान मिळविल्यानंतर त्यांनी राजकरणात चांगला ठसा निर्माण केला. खानापूर तालुक्यात मरगळ आलेल्या सोसायट्याना त्यानी अर्जितावस्था आणली. सहकाराच्या माध्यमातून शेतकर्यांची सेवा करण्याची तीव्र इच्छा होती. या इच्छा शक्तीच्या आधारावरच त्यांनी दूसर्यांदा 2010 साली जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक लढविली. आणि या निवडणुकीत प्रस्थापितांचा पराभव करुन त्यांनी जिल्हा बँकेचे संचालक होण्याचा मान मिळविला.
बर्याच सहकारी संस्था बंद पडण्याच्या मार्गावर होत्या.त्याना उर्जितावस्था आणुन आज 54 कृषी पतीन सहकारी संघ कार्यरत असून तालक्यातील शेतकर्यांना 80 कोटी रु. हून अधिक बिनव्याजी कर्जाचा लाभ मिवून दिला. त्यांच्या सहकारी क्षेत्रातील उत्तुंग भरारी बद्दल द 2015 च्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीत य़ाना बिनविरोध निवडून दिले. त्यांच्या कार्यकाळात तीन वेळा कर्जपाफीचा लाभ शेतकर्यांना मिळाला आहे. 2017 जून मध्ये झालेल्या कर्जमाफीत खानापूर तालुक्यात तब्बल 54 कोटीची कर्जमाफी तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळाली. याचा तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना लाभ मिळाला. शिवाय शेती व्यवसायाला जोडधंदय़ाला प्राधान्य देवून दुग्ध व्यवसाय वाढीसाठी जिल्हा दूध उत्पादक संघाच्या संकलन केंद्रांचा विस्तार वाढवून आज दीडशेहून अधिक दूध संकलन केंद्र उभारली आहेत. अनेक सहकारी संस्था त्यांच्या नेतृत्वाखाली प्रगतीच्या शिखरावर पोहचल्या आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून त्यांनी 2005 पासून अविरतपणे व एक शेतकरी नेता म्हणून केलेल्या कार्याची पोचपावती म्हणून 2013 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत तालुक्यात आमदार होण्याचा मान मिळविला. आमदारकीच्या पाच वर्षात त्यांनी सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र प्रयत्न सुरु ठेवले आहेत. तालुक्यात अनेक विकासाभूमिक योजना अमलात आणून त्या मार्गी लावण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला.
क्रीडा क्षेत्राला ही वाह मिळवून देण्यासाठी विशेष प्राधान्य दिले. तालुक्यात बहुग्राम पाणी योजना अमलात यावी यासाठी आपल्या आमदारकीच्या काळात त्यांनी राज्य शासनाकडे प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला होता. पण या ना त्या कारणाने मंजुरी अभावी राहिला होता. मागील वर्षी विद्यमान भारतीय जनता पार्टीच्या सरकारने देगाव पाणी योजना अंतर्गत या योजनेला मंजुरी दिली असून यामुळे जवळपास 600 कोटीचा निधी मंजूर झाला आहे या अंतर्गत लवकरच खानापूर तालुक्यातील ज्वलंत पाणी समस्या दूर होणार आहे. मलप्रभा नदीवर बंधार्यांची निर्मिती शेतकऱ्यांना उन्हाळी पिकासाठी जीवदान मिळून दिले आहे अशी अनेक विकासाभूमी कमी त्यांनी आपल्या आमदारकीच्या काळात राबवली त्यामुळे आजही त्यांचे नाव सर्वसामान्य नागरिकात राखून आहे. अरविंद पाटील यानी आमदार म्हणून कार्य करत असताना व आजही ते कधी जातीभाषा भेदभाव बाळगत नाहीत. तालुक्यातील सर्वसामान्य माणूस सुखी झाला पाहिजे, शेतकऱ्यांना सरकारच्या योजना मिळाल्या पाहिजेत, यासाठी त्यांचे प्रयत्न नेहमी कार्यतत्व असतात. गोमारी तलावाच्या रखडलेल्या प्रकल्पात तीन कोटीचा निधी खर्च करून त्या भागातील 12 हजार हेक्टर जमिन पाण्याखाली आणली.शिवाय पाठबंधारे विभागाअंतर्गत मलप्रभा नदिच्या पाणलोट भागात बंधारे निर्मीती, मलप्रभेवरील जुण्या बंधार्यांची पूर्णबांधणी, रस्त्यांचा विकास, समूदाय भवणाची निर्मीती,मंदिरांचा विकास, गावोगावी सीसी रस्ते,संगणक वितरण, खानापूर तालूका आरोग्य केंद्रात 100 खाटाची सोय,उपकेंद्राना सोयी, रूग्णवाहिकांची सोय, प्रसंगी आपलेच वाहन बनली. रूग्नवाहिका, आरोग्य विभागाअंतर्गत दिव्यांगाना वाहणाचे वितरण,अशा अनंक योजना हाती घेतल्या आहेत.सार्वजनिक बांधकाम खात्याअंतर्गत अनेक राज्यमार्गाच्या विकासाला प्राधान्य, गावागावातील रस्त्यांचा विकास,आमदार निधीतून अनेक गावात समूदाय भवण,मंदिराचा विकास साधला. पशू वेद्यकिय खात्य़ाकडून गोरगरीबाना पशूभाग्य योजना, कृषी विकास योजना,विमा योजनांचा लाभ मिळवून दिला आहे.
खानापूर तालुक्याच्या मराठी भागात आजही त्यांचे तितकेच वजन आहे भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश करून एक सक्षम नेतृत्व असल्याची त्यांनी जाण ठेवले आहे. मराठी भागात त्यांनी आमदारकीच्या काळात राखलेली माणुसकी याची जाण या भागातील जनतेत आजही आहे. चांगल्या वाईट प्रसंगी धावून जाणारा नेता म्हणून त्यांची ओळख असल्याने गावागावात आज ते माजी आमदार असले तरी तितक्याच जोमाने लोकनेता म्हणून परिचित आहेत. मागील जि. पं. ता. पं. निवडणुकासह विविध संघ-संस्थावर समितीचे वर्चस्व कायम ठेवले आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी जनतेला विस्वासात घेऊन म. ए. समितीचा बाल्लेकिल्ला राखण्यासाठी त्यांनी रणनिती आखली. पण स्वकीयानिच घात केला. त्यामुळे नाराज झालेल्या माजी आमदार अरविंद पाटील यांनी वर्षभरापूर्वी आपला राजकीय मार्ग बदलत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून खानापूर तालुक्याच्या जनसेवा त्यांनी स्वतःला वाहून घेतले आहे.त्यांनी जिल्हा बँकेचे सतत 4वेळा संचालक व आमदार म्हणून त्यांनी अत्यंत उत्तम कार्य करुन जनमाणसात आगळा ठसा उमठवला आहे .
अशा या उत्तुंग व युवकांचे प्रेरणास्थान असलेल्या नेतृवाला पुन्हा नेतृत्व करण्याची संधी मिळावी त्यांच्या समाजसेवेला पुन्हा एकदा उभार यावी हीच अपेक्षा, तसेच उर्वरित आयुष्य सुखा समृद्धीचे व समाधानाचे जावे व त्यांना शतायुष्य, लाभो, हि सदिच्छा…