खानापूर : खानापूर तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासून प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी वर्गाला अवकाळी पावसाने दिला आहे. बुधवारी दुपारी अचानकपणे ढगाळ सदृश वातावरण खानापूर परिसरात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी वर्गाला हायसे वाटले आहे. खर तर सूगीच्या हंगामानंतर खानापूर तालुक्यात अवकाळी पावसाने पूर्णतः दांडी मारली आहे. वातावरणात कमालीची उष्मा वाढल्याने बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. उन्हाळी वातावरण सुरू झाल्याने बारमाही पिकासाठी आता पावसाची गरज आहे. त्यामुळे बळीराजा मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
नंदगड भागात दमदार पाऊस खानापूर परिसरात पावसाचा शिडकावा झाला मात्र नंदगड भागात थोडा दमदार पाऊस झाल्याने नंदगड बाजारपेठेवर परिणाम झाला अचानकपणे पाऊस सुरू झाल्याने बुधवारच्या नंदगड बाजारपेठेत आलेल्या ग्राहकांची गैरसोय झाली यामुळे या भागात असलेल्या वीट व्यवसायिकांना धोका पोहोचला आहे.
वीट उत्पादकात धास्ती
खानापूर तालुक्यात शेती व्यवसायावर वीट व्यवसाय हा महत्त्वाचा मानला जातो. वीट व्यावसायिक गेल्या दोन-तीन महिन्यापासून वीट व्यवसायात गुंतले आहेत. अवकाळी पावसाने साथ दिल्याने अनेकानी चांगला व्यवसाय केला आहे. पण होळी पौर्णिमेनंतर वीट व्यवसाय थोडाफार कमी होतो,पण तरी देखील अलीकडच्या काळात संपूर्ण उन्हाळ्यात मीठ व्यवसाय करणारे अनेक व्यवसायिक आहेत. अशा व्यवसायिकांना या अवकाळी पावसाने धास्ती निर्माण झाली आहे. खरं तर या व्यवसायाला अवकाळी पाऊस धोक्याचा आहे, पण शेती व्यवसायासाठी पोषक असल्याने शेतकरी वर्ग मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे.