अल्लेहोळ: गोंधळ ही एक शैक्षणिक, मनोरंजक आणि महत्त्वाची परंपरा आहे.गोंधळ ही एक धार्मिक लोककला आहे. ज्यामध्ये गोंधळी लोक देवतांचे आवाहन करतात. देवी रेणुका किंवा देवी तुळजाभवानी यांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी, भक्त कुटुंबातील पारंपारिक गोंधळीला आमंत्रित करतात . अशाच पद्धतीने एखाद्या गावची ग्रामदेवता आदिशक्तीच्या नावे स्थापन असेल तर त्या देवींचा गोंधळ जागरण कार्यक्रम करण्याची परंपरा आपल्या हिंदू संस्कृतीत आहे. याच अनुषंगाने अल्लेहोळ गावचा हा तीन वर्षाचा श्री मर्यामा देवीचा गोंधळ विशेष अभिनंदनिय असल्याचे विचार खानापूर तालुका भाजपा नेते व महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल हलगेकर यांनी व्यक्त केले.
मंगळवारी सायंकाळी आलेहोळ येथे श्री मरेवा देवीचा गोंधळ कार्यक्रम उत्साहात पार पडला, यावेळी ते बोलत होते.
पुढे ते म्हणाले, जागरण आणि गोधळ ही महाराष्ट्रातील परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना देवी अंबाबाईचा आशीर्वाद मिळाव तानाजी मालुसरे सारख्या सुभेदार मावळ्यांनी स्वराज्य निर्मितीसाठी अशा गोंधळ कार्यक्रमांचे आयोजन करून जनजागृती केली. पद्धतीने असे कार्यक्रम हे गावात एकात्मता व सौखशांती नोंदवण्याचे काम करतात असे ते म्हणाले. यावेळी आले व ग्रामस्थ कमिटीच्या वतीने यांचा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. शंकर पाटील, चंद्रकांत पाटील, संजय पाटील, परसराम तोरगल, सदानंद पाटील महादेव पाटील नामदेव तोरगल यासह गावातील अनेक युवा कार्यकर्ते पंचमंडळी उपस्थित होते त्यांच्यासमवेत भरमानी पाटील, उदय भोसले आधी कार्यकर्ते उपस्थित होते
आज गोंधळ जागरण चा मुख्य दिवस मंगळवारपासून सुरू असलेल्या श्रीमर्यांमादेवी गोंधळ जागरण कार्यक्रम उत्साहात सुरू असून आज बुधवारी दिवसभर नवस फेडवादी कार्यक्रम होणार आहे या निमित्ताने रात्री 10 वा. रिया पाटील कोल्हापूर प्रस्तुत ‘वेड घुंगराच’ हा नृत्य कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाला अनेक मान्यवर मंडळींना निमंत्रित करण्यात आले आहे.