खानापूर : तरुणांनी मन, मनगट आणि मेंदू सशक्त करण्यासाठी खेळ, व्यायाम आणि वाचनाची सवय लावून घेतली पाहिजे. उद्याच्या समृद्ध देशाच्या प्रगतीसाठी वापर करून कर्तव्यनिष्ठा जपावी.समाजासाठी आजची तरुण पिढी गुणवान आणि चारित्र्यवान होणे आवश्यक आहे. त्यासाठी तरुणांनी आरोग्य संपन्न जीवन जगावे असे आवाहन महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल हलगेकर यांनी केले.
नागुर्डा (ता. खानापूर) येथे कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून म. ए. समितीचे युवा नेते निरंजन सरदेसाई म्हणाले, नागुर्डा परिसरातील जनतेने मराठी भाषा आणि संस्कृती संवर्धनाच्या कार्यात मोलाचे योगदान दिले आहे. भविष्यातही मराठीच्या माय रक्षणासाठी प्रत्येकाने जबाबदारीने कर्तव्य पार पाडावे असे आवाहन केले. या स्पर्धेतील विजेत्या संघांना उपस्थित होते.महालक्ष्मी ग्रुपच्या वतीने बक्षीसे देण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष बाळू बिर्जे, लैला साखर कारखान्याचे एमडी सदानंद पाटील, भाजपचे युवा नेते पंडित ओगले, खानापूर तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष भरमाणी पाटील आदी उपस्थित होते.