खानापूर:
खानापूर लोंढा येथील रहिवासी व सकाळ वृत्तपत्रातून गेली पंधरा वर्षे तालुका प्रतिनिधी म्हणून काम केलेले जेष्ठ पत्रकार परशराम मारुती पांडव (वय 58)यांचे बुधवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे
श्री परशराम पांडव हे एक उत्कृष्ट पत्रकार म्हणून खानापूर तालुक्यात परिचित होते. त्यांनी पत्रकारितेत येण्यापूर्वी 2000 मध्ये लोंढा ग्रामपंचायतचे उपाध्यक्ष म्हणून सेवा बजावली होती. शिवाय ते एक उत्कृष्ट क्रिकेटपटू देखील होते, गोव्यातील एका संघामधून त्यांनी फास्टर बॉलर म्हणून त्यांची ओळख होती. पण सुदैवाने त्यांना त्या क्षेत्रात जाता आले नाही.त्यांनी आपल्या उपजीविकेचा मार्ग म्हणून गेला दहा पंधरा वर्षांपूर्वी पत्रकारितेमध्ये स्वतःला झोकून दिले होते. गेल्या दोन-तीन वर्षापासून त्यांना एका गंभीर आजाराने घेरले होते, पण उपचारासाठी त्यांच्या प्रकृतीने साथ दिली नाही त्यामुळे त्यांचा बुधवारी दुपारी दुर्दैवी मृत्यू झाला. सायंकाळी 6 वाजता लोंढा येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.