कर्नाटक राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा निर्णय !खानापुरात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषद
खानापूर: कर्नाटक राज्य सरकारी नोकर संघाच्या वतीने सातवा वेतन आयोग तसेच जूनी पेन्शन योजना (0ps)तात्काळ लागू करण्यात यावा. यासाठी संपूर्ण कर्नाटकातील सरकारी कर्मचारी दि.01 मार्च रोजी कर्तव्यात गैरहजर राहून बेमुदत आंदोलन छेडणार असल्याची माहिती खानापूर तालुका कर्नाटक सरकारी नोकर संघाचे अध्यक्ष बी.एम. यळुर यांनी मंगळवारी खानापुरात बोलवलेल्या एका पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेला खानापूर तालुका कर्नाटक राज्य सरकारी नोकर संघटनेचे गौरवध्यक्ष के. आर. कोलकार, प्रौढ शाळा सहशिक्षक संघाचे अध्यक्ष टी.आर.पत्री, तालुका क्रीडा कार्यदर्शी शिवानंद औराधी, nps तालुका अध्यक्ष रमेश कोळेकर, संचालक सुरेश गडाद, एम. एस. पुजार, सादिक पाच्छापूर, तालुका सरकारी नोकर संघटनेच्या खजिनदार जे.पी. पाटील, महिला उपाध्यक्ष शोभा सौंदत्ती, बिरादार पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना बी.एम. म्हणाले, खानापूर तालुक्यात जवळपास 2100 विविध खात्याअंतर्गत सरकारी कर्मचारी आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन व (ops)जुनी पेन्शन योजना लागू करण्या संदर्भात नुकताच झालेल्या बजेटमध्ये सरकारने काहीच निर्णय घेतला नाही. यामुळे कर्नाटक राज्य सरकारी नोकर संघाचे अध्यक्ष सी.एस. शडाक्षरे यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली. या बैठकीत संपूर्ण कर्नाटकात दि.01 मार्च पासुन कर्तव्यात गैरहजर राहून आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार खानापूर तालुक्यातही त्या आदेशाचे पालन करण्यात येणार असून कोणत्याही शासकीय कार्यालयात कर्मचारी सरकारी कर्मचारी उपस्थित राहणार नाहीत. यासाठी खानापूर तालुक्यातील समस्त सरकारी कर्मचाऱ्यांनी सहकार्य करून आपल्या हक्काच्या मागणीसाठी कार्यतत्पर राहावे असे आवाहन या पत्रकार परिषदेत द्वारे करण्यात आले.
शासकीय सेवेवर बहिष्कार
कर्नाटक राज्य सरकारी नोकर संघाच्या वतीने एक मार्च पासुन सेवेत गैरहजर आंदोलन हाती घेतल्याने तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालय विनाघोषित बंद राहणार आहेत, यामध्ये तातडीची सेवा असलेल्या अग्निशामक दल वैद्यकीय सेवेत कर्मचाऱ्यांना थोडीफार मुभा असली तरी दंडावर काळी फीत बांधून त्यांनी सेवा करावी असा आदेश कर्नाटक राज्य सरकारी नोकर संघाच्या वतीने घेण्यात आला आहे एकूणच आज एक मार्चपासून होणाऱ्या या सरकारी सेवेत गैरहजर आंदोलन जोपर्यंत मागण्याची पूर्तता होणार नाही तोपर्यंत चालूच राहणार असल्याची माहिती यावेळी या पत्रकार परिषदेत द्वारे दिली.