खानापूर : तालुका कुस्तीगीर संघटनेची बऱ्याच दिवसानंतर फेरबदल करणारी बैठक येथील श्री लक्ष्मी मंदिरामध्ये पार पडली या बैठकीत गेल्या 13 14 वर्षात तालुका कुस्तीगीर संघटनेने हाती घेतलेल्या कुस्ती आखाडा व नियोजना संदर्भात चर्चा करण्यात आली व पुढील कालावधीसाठी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड घोषित करण्यात आली तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष तानाजीराव कदम निडगल यांची तर कार्याध्यक्ष सुरेश पाटील चापगाव यांची निवड करण्यात आली आहे या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संघटनेचे संस्थापक दिलीप पवार होते
तर विस्तारित कार्यकारणी मध्ये स्वागताध्यक्षपदी मोईद्दीन गावणगीरी, सेक्रेटरीपदी रमेश पाटील, खजिनदार पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली, निवडीनंतर नवीन पदाधिकाऱ्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यानंतर दिलीप पवार, सुरेश पाटील, तानाजी कदम, राजाराम गुरव, रमेश पाटील, आबासाहेब दळवी, यशवंत बिर्जे, प्रविण सुळकर, किरण यळुरकर,आदींची भाषणे झाली. येत्या आठ दिवसांमध्ये नवीन पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येवुन लवकरच खानापूर शहरात भव्य कुस्ती आखाडा भरविण्याचे ठरविण्यात आले यावेळी देवाप्पान्ना गुरव, नारायण घाडी, प्रविण सुळकर, रामचंद्र खांबले, आप्पाना डेळेकर, राजू चिखलकर, राहुल सावंत, अप्पय्या गुरव, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.