खानापूर:
श्री महालक्ष्मी ग्रुप एज्युकेशन सोसायटी टोपीनकट्टी संचलित शांतिनिकेतन पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर च्या बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ सोमवार दिनांक 13.02.2023 रोजी पार पडला.
श्री महालक्ष्मीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रमुख पाहुणे गुरुजी श्री रमेश एम. गंगूर बेळगाव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जीवनात यशस्वी होण्यासाठी व्यक्तिमत्त्व विकास गरजेचा आहे. आपले ध्येय गाठण्यासाठी आत्मविश्वास, धाडस, संयम याची गरज आहे. त्यासाठी वेगवेगळी कौशल्ये जीवनात विकसित करा. वेळेचे व्यवस्थित नियोजन करा. तंत्रज्ञानाचे युग असल्याने, प्रत्येकाने संगणकाचे ज्ञान ही घ्या असे ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक-अध्यक्ष, लैला शुगर्स प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन, भाजप नेते श्री विठ्ठल सोमाण्णा हलगेकर हे होते.
प्राचार्य श्री प्रसाद पालनकर यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून बारावीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेबद्दल मार्गदर्शन केले.
व्यासपीठावर संस्थेचे संचालक श्री.विठ्ठल एम.करंबळकर, सचिव श्री राजेंद्र एस पाटील, श्री चांगाप्पा निलजकर, लैला शुगर्स प्रायव्हेट लिमिटेडचे एम.डी. श्री सदानंद पाटील, प्राचार्य श्री प्रसाद पालनकर, विज्ञान विभाग प्रमुख श्री विशाल करंबळकर, वाणिज्य विभाग प्रमुख श्री श्रीशैल मोगलानी, तसेच संस्थेचे संचालक, प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तेजस्विनी सगरे यांनी केले. प्राध्यापक श्री परशराम पाटील यांनी शेवटी आभार व्यक्त केले.