लोकोळी: लोकोळी जैनकोप ग्रामदेवता श्री लक्ष्मीदेवी उत्सवाची बुधवारी सायंकाळी सांगता झाली. सायंकाळी पाच वाजता देवी गदगे वरून उठल्यानंतर देविचा तब्बल तासभर यात्रा परिसरात देवीचा खेळ झाला. त्यानंतर सायंकाळी सात वाजता देवी शिमेकडे प्रयाण झाली. जैनकोप- लोकोळी गावच्या सीमेलगत देवी पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी गावातील प्रमुख मंडळींनी धार्मिक विधी पार पडल्या.
ग्रामदेवता श्री लक्ष्मी देवीचा हा यात्रा उत्सव तब्बल 22 वर्षांनी या दोन्ही गावांनी साजरा केला. गेल्या आठ दिवसात या यात्रेच्या ठिकाणी सात ते आठ लाख भाविकांनी देवी दर्शनाचा लाभ घेतला. या यात्रेचा झालेली गर्दी स्मरणीय झाली. देवीच्या विवाह सोहळ्याला देखील जवळपास पंधरा ते वीस हजार भाविकांनी दर्शवली होती. शिवाय रविवारी देखील स्नेहभोजनासाठी व देवीच्या दर्शनासाठी संपूर्ण गाव परिसर चक्काजाम झाला होता. गेल्या आठ दिवसांमध्ये देवीच्या दर्शनासाठी तसेच पै पाहुण्यांच्या भेटीगाठी मित्र परिवारांच्या भेटीगाठीसाठी एकच गर्दी झाली होती. या यात्रोत्सवामुळे भाविकांचे तसेच पाहुण्यांच्या ऋणानुबंध जपण्यात आले. विशेष म्हणजे या यात्रोत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, शांततेत व व्यवस्थित यात्रा पार पडली. त्यामुळे ग्रामस्थ कमिटीने देखील समाधान मानले आहे. एकूणच तब्बल 22 वर्षांनी भरलेले ही यात्रा लोकोळी व जैनकोप ग्रामस्थांच्या जीवनात अविस्मरणीय ठरली आहे.