खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने विजय संकल्प अभियान गावागावात राबवण्याचे प्रक्रियेला जोर आला आहे. खानापूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी गावागावात जाऊन भाजपचा अभियानाला चालना देत आहेत. मंगळवारी तालुक्यातील बिदरभावी गावात विजय संकल्प अभियान उत्साहात राबवण्यात आले. कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन भाजपच्या योजना व भाजपची ध्येयधोरणे यासंदर्भात जागृती केली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे नेते व महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल हलगेकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, मंडल अध्यक्ष संजय कुबल, रयत मोर्चा तालुकाध्यक्ष प्रकाश तीरवीर, बूथ प्रमुख मारुती पाटील इराप्पा पाटील, अभिजीत चांदिलकर, लैला शुगरचे एमडी सदानंद पाटील, पांडुरंग लोकोलकर, बळीराम पाटील, शंकर पाटील, लक्ष्मण त्तिरवीर, सोमनाथ तिरविर, गोपाळ भेकणे,यल्लाप्पा शहापूरकर परसराम तिरविर, शंकर तिरविर यासह अनेक जण उपस्थित होते.