- खानापूर(प्रतिनिधी) : भारतभूमी ही देवभूमी मांडले जाते.भारतीय संस्कृतीतील आचार विचार व धार्मिकता ही जगाच्या पाठीवर सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे भक्तीभाव हा कधी वाया जात नाही. देशामध्ये अठराव्या शतकात साम्राज्यशाही होती, त्यावेळेला प्रत्येक साम्राज्यामध्ये महालक्ष्मी देवीला गणले जात होते, प्रमुख ठिकाणी महालक्ष्मी देवी ही सर्वश्रेष्ठ असायची. आजच्या काळात अनेक गावात महालक्ष्मी मंदिर आहेत तर अनेक ठिकाणी याच देवीच्या नावे वेगवेगळ्या रूपाची देवीची मंदिरे आहेत ही सर्व मंदिरे भक्तीचे श्रद्धास्थान मानले जाते. आज लोकोळी जैनकोप गावाने भरवलेली महालक्ष्मी यात्रा 22 वर्षानंतर या भागातील भाविकांना एक प्रेरणादायी ठरली आहे. अथांग असा जनसमुदाय या देवीच्या विवाह सोहळ्याला येतो तो प्रसंग डोळ्याचे पारणे फेडणारा होता. म्हणून या देवीच्या दर्शनासाठी प्रत्येक भाविकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा व श्रद्धेने हा यात्रा उत्सव सर्वांनी पार पडावा असे आवाहन भाजप नेते व महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल हलगेकर यांनी व्यक्त केले. शुक्रवारी सायंकाळी या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने गावातील महालक्ष्मी भजनी मंडळ यांच्या वतीने “अन्यायाचा बदला” हा नाट्यप्रयोगी आयोजित करण्यात आला होता. या नाट्यप्रयोगाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यात्रा कमिटीचे उपाध्यक्ष तुकाराम चव्हाण होते. उपस्थितयांचे स्वागत यात्रा कमिटीचे अध्यक्ष नारायण पाटील यांनी केले. ऑर्डीनरी कॅप्टन बाळकृष्ण पाटील यांनी यावेळी स्वागतपर विचार व्यक्त करून यात्रेच्या आयोजनाबद्दल व भाविकांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी व्यासपीठावरून बोलताना तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष भरमाणी पाटील म्हणाले यात्रा भरवण्यासाठी पूर्वजांनी एकी व समाजात आपुलकी नांदावी भक्तीभाव जागृत व्हावा यासाठी या यात्रा भरवण्यात आल्या.परंतु अशा यात्रा भरवताना येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी यासाठी विकासाभूमी कामेही राबवणे काळाची गरज बनते. यासाठी खानापूर तालुक्यातील तमाम नागरिकांनी या पुढील काळात खानापूर तालुक्यातील योग्य नेतृत्वाच्या पाठीशी राहावे तालुक्यातील व्यक्तीलाच विकासाची कळ कळते यासाठी प्रत्येकाने दोन महिन्यात होणाऱ्या आमदारकीच्या निवडणुकीत स्थानिक उमेदवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले. तसेच विठ्ठल हलगेकर यांनी गेल्या पंचवीस वर्षात शैक्षणिक सामाजिक व राजकीय क्षेत्रात हाती घेतलेल्या कामाबद्दल आढावा मांडला. यावेळी भाजप युवा नेते अभिजीत चांदीलकर यांनीही विचार मांडले. कार्यक्रमात सूत्रसंचालन पिराजी कुऱ्हाडे यांनी तर आभार पुंडलिक वालेकर यांनी मांडले. यावेळी व्यासपीठावर गावातील अनेक जाणती मंडळी उपस्थित होते.