किरहलशी:
किरहलशी ता. खानापूर येथील दर तीन वर्षांनी साजरा करण्यात येणाऱ्या श्री हुडगामादेवीचा यात्रोत्सव येत्या मंगळवार दि 14 व 15 फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे या निमित्ताने आज रविवार दि. 12 फेब्रुवारी रोजी येथील देसाईदार उत्सव होऊन दुपारी महाप्रसाद होणार आहे. तर मंगळवार दि. 14 रोजी श्री हूडगामा व श्री लक्ष्मी देवीच्या ओठ्या भरणी चा कार्यक्रम राहणार आहे. या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने मंगळवार दि 14 रोजी रात्री 10 वां कोल्हापूर येथील मोरे बंधू दिग्दर्शित आकाश आर्केस्ट्रा आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाला खानापूर तालुक्यातील सर्व राजकीय मंडळींना निमंत्रित करण्यात आले आहे.तर बुधवार दि.15 रोजी सकाळपासून नवसफेड व दुपारी महाप्रसाद होणार आहे. त्याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थ कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.