लोकोळी: लोकोळी येथे गेल्या तीन चार दिवसापासून सुरू असलेल्या ग्रामदेवता लक्ष्मीदेवीच्या यात्रा उत्सवास माजी मुख्यमंत्री व निधर्मी जनता दलाचे नेते एचडी कुमार स्वामी यांनी शुक्रवारी सायंकाळी धावती भेट दिली. व देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत अनेक कार्यकर्त्यांचा ताफा देखील होता.
खानापूर तालुक्यात शुक्रवारी माजी मुख्यमंत्री जनता दलाच्या पंचतंत्र अभियानांतर्गत अनेक गावांचा दौरा केला यावेळी त्यांनी लोकोळी जैनकोप गावच्या ग्रामदेवता लक्ष्मीदेवी यात्रोत्सवाला देखील भेट देऊन या उत्सवात सहभागी झाले. यावेळी पंचतंत्र अभियानासंदर्भात उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांच्यासमवे निधर्मी जनता दलाचे नेते नासिर बागवान रेवणसिद्धया हिरेमठ, विशाल पाटील, बिच्चनावर यासह गावातील निधर्मी जनता दलाचे कार्यकर्ते गोविंद चव्हाण, गोपाळ पाटील, प्रसाद पाटील, श्रीरंग माने आधी कार्यकर्ते होते .यावेळी श्री महालक्ष्मी यात्रा देवी उत्सव कमिटीचे अध्यक्ष नारायण पाटील,उपाध्क्षपद तुकाराम चव्हाण, परसराम पाटील सह यात्रा कमिटीचे बरेच सदस्य उपस्थित होते यावेळी यात्रा कमिटीच्या वतीने माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचा सत्कार करण्यात आला.