खानापुर: खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांनी महाराष्ट्र केकरण समितीकडे अर्ज करावेत असे आवाहन केले होते. यासाठी 10 फेब्रुवारी दुपारी 2 वाजेपर्यंत तुम्ही इच्छुकानी अर्ज करावेत असे आवाहन म ए समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले होते. यासंदर्भात गेल्या दोन-तीन दिवसापासून अनेकांनी आपले अर्ज दाखल करण्याचे प्रारंभ केला होता. आज 10 फेब्रुवारी अखेरपर्यंत एकूण सात अर्ज दाखल झाले आहेत. त्यामध्ये मुरलीधर गणपतराव पाटील (जळगा) निरंजन उदयसिंह सरदेसाई (खानापुर)गोपाळराव मुरारी पाटील (गर्लगुंजी)पांडुरंग तुकाराम सावंत (गर्लगुंजी) आबासाहेब नारायण दळवी (मनतर्गा), विलास कृष्णाजी बेळगावकर (कुसमळी), रुखमना शंकर झुंजवाडकर (खैरवाड) असे सात अर्ज दाखल झाले आहेत.
सदर अर्जांचा स्वीकार खानापूर तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, कार्याध्यक्ष यशवंत बिरजे, सचिव सिताराम बेडरे, खजिनदार संजीव पाटील अनेक समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्र एकीकरण समितीने आगामी विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी व महाराष्ट्र एकीकरण समितीची संघटना बळकट करण्यासाठी गेल्या महिन्याभरापासून यासंदर्भात विचार विनिमय व चर्चासत्र सुरू आहे यानुसार महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून निवडणूक लढवणाऱ्या इच्छुकांनी 51000 रुपये डिपॉझिट करून अर्ज करण्याचे आवाहन केले होते या आवाहनानुसार सात इच्छुकांनी समितीकडे अर्ज दाखल केले आहे.