IMG-20230201-WA0021


खानापूर: कुपटगिरी येथे 86 वा श्री पांडुरंग अखंड नाम सप्ताह 31जानेवारीपासून प्रारंभ झाला आहे. यानिमित्ताने हभप पुंडलिक पाचंगे असोगा यांच्या अधिष्ठनाखाली सोहळ्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यानिमित्ताने मंगळवार दि . ३१-१-२०२३ रोजी रात्री ८ वा संतांच्या हस्ते पोती व नित्य पूजा नंतर नागेश देव भजनी मंडळ, नागुर्डा ता. खानापूर यांचा संगीत भजन भारुड कार्यक्रम पार पडला. आज बुधवार दि . १-२-२०२३ रोजी पहाटे काकडा आरती. सकाळी ११ ज्ञानेश्वरी वाचन त्यानंतर सकाळी ११ ते सायंकाळी ६ पर्यंत भजनाचा कार्यक्रम त्यानंतर नंतर ६ ते ७ ह.भ.प मारुती होसुरकर मु.किणये ता बेळगांव यांचे प्रवचन, त्यानंतर ” जय जय रामकृष्ण हरी ” या पवित्र बिज मंत्राचा नामजप , नंतर ह.भ.प .श्री. चैतन्य सद्गुरु नामदेव नाना महाराज वासकर यांच्या आज्ञेनुसार ह.भ.प. श्री.दिगंबर जाधव पंढरपुर यांचे किर्तन, रात्री श्री विठ्ठल रखुमाई भजनी मंडळ,कर्ले यांचा भारूड भजनाचा कार्यक्रम होईल गुरुवार दि . २-२-२०२३ रोजी पहाटे काकडा आरती त्यानंतर द्वादशी अभंग व आरती दुपारी महाप्रसाद होऊन सायंकाळी मलप्रभेवरील पुंडलिकाची भेट घेऊन गावात पालखी व दिंडी सोहळा होऊन उत्सवाची सांगता होणार आहे तरी वारकरी व भाविकांचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थ पंचम मंडळी , वारकरी मंडळी कुपटगीरी यांच्या वतीने करण्यात आले आहे

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us