खानापूर ; अलीकडच्या काळात बेकारीचे प्रकार अधिक प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे भरकटलेला युवावर्ग कधी काय करेल हे सांगणे कठीण झाले आहे.त्यामुळे सधन माणसांच्या जीवावर अनेक वेळा वाईट प्रसंग येण्याची परिस्थिती निर्माण होताना दिसते. दुर्गम भागातील काही अज्ञात रस्त्याच्या ठिकाणी रात्रीच्या वेळी येणाऱ्या वाहनांना अडवून लुटण्याचे प्रकार यापूर्वी अनेक वेळा घडले आहेत. अशाच प्रकार खानापूर -जांबोटी रस्त्यावरील रामगूरवाडी क्रॉस ते मोदीकोप दरम्यान रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन दुचाकी अडवण्याचा प्रकार दोन दिवसात दिसून आले आहेत. खानापूर शिवाजीनगर मधील एक व्यवसायिक काल रात्री दहाच्या सुमारास घराकडे जात असताना दोन दुचाकी धारकांनी तोंडावर मास्क बांधून अडवण्याचा प्रयत्न केला पण त्याने सावधगिरी बाळगून आपल्या वाहनाचा वेग वाढवला व घरी पोहोचण्यात समाधान मानले. अशाच प्रकारे चार दिवसापूर्वीही आणखी एकाला रात्रीच्या वेळी अडवण्याचा प्रकार घडला होता, पण त्यानेही प्रसंगावधान साधून तिथून जाणे पसंत केले. असाच प्रकार वर्षभरापूर्वी देखील याच रस्त्यावर तसेच जांबोटी पिरनवाडी रस्त्यावर वाहने अडवण्याचे प्रकार घडले होते, पण पोलिसांनी त्यांना वेळीच जेरबंद केले. यासाठी या ठिकाणी रात्रीच्या वेळी एकट्याने जाणे जोकरीचे बनले आहे. यासाठी या भागातील नागरिकांनी सावधगिरी बाळगावी तसेच पोलिसांनी या संदर्भात गस्त घालून या ठिकाणचा धोका टाळावा अशी मागणी सदर व्यवसायिकाने केली आहे.