बेळगाव : दैनिक पुढारी वृत्तपत्र समूहाच्या वतीने बेळगाव येथील हॉटेल रिजेंटा येथे आयोजित सहकार महापरिषदेचे उद्घाटन भाजपा नेते श्री महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक आणि लैला साखर कारखान्याचे चेअरमन विठ्ठलराव हलगेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी दैनिक पुढारीचे जनरल मॅनेजर राजेंद्र मांडवकर, निवासी संपादक गोपाळ गावडा, माजी सहकार विभाग सहसंचालक डी. ए. चौगुले रेणुका, रेणुका माता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक चेअरमन प्रशांत भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी खानापूर तालुक्याच्या विकासात सहकार चळवळीने दिलेले योगदान या विषयावर हलगेकर सरांनी मनोगत व्यक्त केले.