निडगल तालुका खानापूर येथील ज्येष्ठ माता स्वर्गीय आनंदीबाई म. तोपिनकट्टी
यांच्या स्मरणार्थ निडगल येथील मराठी हायर प्राथमिक शाळा येथे वार्षिक समारंभ 26 जानेवारी रोजी पार पडला. शालेय विध्यार्थ्यांचा शैक्षणिक व बौद्धिक विकास व्हावा यासाठी वर्षभर पाहिली ते सातवी च्या प्रत्येक वर्गासाठी प्रत्येक शनिवारी वाचन, चित्रकला, कागदी वस्तू निर्माण, माती हस्तकला, भाषण, हस्ताक्षर आदी स्पर्धा आयोजिल्या जातात. वर्षभर चांगली हजेरी व स्वच्छ राहण्याची सुद्धा स्पर्धा आयोजिली जाते. या सर्व स्पर्धाची बक्षीसे प्रा. भरत तोपिनकट्टी आपल्या मातोश्री कै. आनंदीबाई यांच्या स्मरणार्थ दरवर्षी प्रायोजित करतात. दरवर्षी प्रमाणे यावर्षी लिहिण्यासाठी पॅड, वह्या, पेन्सिल बॉक्स, स्केच पेन बॉक्स, पाण्याची बॉटल, रंग पेटी व इतर शालोपयोगी वस्तू रुपात एकूण 147 पारितोषिकांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. दशरथ कुंभार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. गावातील ज्येष्ठ नागरिक श्री महादेव कदम हे अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पाटील, शाळा सुधारणा समितीचे सर्व सदस्य, श्री नागेश चोपडे, श्री शांताराम कदम व निडगल गावातील नागरिक व पालक बहुसंख्येने उपस्थित होते. शाळेतील शिक्षका श्रीमती गुरव यांनी सूत्रसंचालन केले. श्री खांबले यांनी आभार मानले.