Home » चापगावच्या धर्मवीर संभाजी चौकातील धोकादायक खड्ड्याचा प्रश्न मार्गी!

चापगावच्या धर्मवीर संभाजी चौकातील धोकादायक खड्ड्याचा प्रश्न मार्गी!

file_00000000c35c82118e2fc84dec38dd6d

चापगावच्या धर्मवीर संभाजी चौकातील धोकादायक खड्ड्याचा प्रश्न मार्गी!

माजी उपाध्यक्ष मारुती चोपडे यांच्या पुढाकारातून सीडी वर्कचे काम पूर्ण; नागरिकांना दिलासा

चापगाव : येथील धर्मवीर संभाजी चौक (यडोगा रोड) परिसरातील गेल्या वर्षभरापासून अपघाताला निमंत्रण देणाऱ्या धोकादायक खड्ड्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष मारुती चोपडे यांनी पुढाकार घेऊन ग्रामपंचायतीच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतर संबंधित ठिकाणी नव्याने पाईप टाकून सीडी वर्कचे काम करण्यात आले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

गेल्या वर्षभरापासून या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आलेले सीडी वर्कचे काम अर्धवट अवस्थेत होते. त्यामुळे रस्त्यालगत मोठा खड्डा निर्माण होऊन तो वाहनचालक व पादचाऱ्यांसाठी धोकादायक बनला होता. रात्रीच्या वेळी या खड्ड्याचा अंदाज न आल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती.

याबाबत सामाजिक कार्यकर्ते कल्लाप्पा कदम यांनी ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करूनही प्रश्नाकडे अपेक्षित लक्ष दिले जात नव्हते. अखेर माजी उपाध्यक्ष मारुती चोपडे यांनी या समस्येत लक्ष घालून ग्रामपंचायत प्रशासनाच्या निदर्शनास वस्तुस्थिती आणून दिली. त्यानंतर संबंधित ठिकाणी नव्याने पाईप टाकून खड्डा बुजविण्याचे काम करण्यात आले. यामुळे संभाव्य अपघाताचा धोका कमी झाला असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सार्वजनिक ठिकाणच्या अशा धोकादायक समस्यांकडे वेळीच लक्ष देऊन त्यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे. या कामामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी माजी उपाध्यक्ष मारुती चोपडे, सामाजिक कार्यकर्ते कल्लाप्पा कदम, पत्रकार पिराजी कुराडे, अशोक कदम, ज्ञानेश्वर सुतार, ग्रामपंचायत सचिव रामाप्पा कोलेकर, लिपिक राजू पाटील आदी उपस्थित होते.

oplus_2098176

फोटो कॅप्शन : चापगाव धर्मवीर संभाजी चौक (यडोगा रोड) येथील धोकादायक खड्ड्यात नव्याने पाईप टाकून सीडी वर्कचे काम करताना. उपस्थित माजी उपाध्यक्ष मारुती चोपडे व ग्रामस्थ.

Do Share
error: Content is protected !!
Call Us