Home » खानापूरच्या स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचा सांस्कृतिक स्पर्धेत डंका! विद्यार्थ्यांनी विविध पुरस्कारांवर कोरले नाव; महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा!

खानापूरच्या स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचा सांस्कृतिक स्पर्धेत डंका! विद्यार्थ्यांनी विविध पुरस्कारांवर कोरले नाव; महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा!

IMG-20261120-WA0045

खानापूरच्या स्वामी विवेकानंद पदवीपूर्व महाविद्यालयाचे सांस्कृतिक स्पर्धेत घवघवीत यश!

विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी पटकावले प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक; महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा

खानापूर : खानापूर येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण सेवा सोसायटी संचलित श्री स्वामी विवेकानंद पदवीपूर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत महाविद्यालयाचा नावलौकिक वाढविला आहे. विविध कला, साहित्य आणि विज्ञानविषयक स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावून आपल्या गुणवत्तेची चमक दाखविली.

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण सेवा सोसायटी आणि पदवीपूर्व शिक्षण खाते, बेळगाव जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने खानापूर तालुक्यातील पदवीपूर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत तालुक्यातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये श्री स्वामी विवेकानंद पदवीपूर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केले.

प्रथम क्रमांक पटकावणारे विद्यार्थी :

  • इंग्रजी निबंध स्पर्धा – वनश्री पाटील.
  • कन्नड एकपात्री अभिनय – भूमिका तारीहाळकर.
  • विज्ञान मॉडेल – नैतिक पाटील आणि मोहम्मद लबीब.

द्वितीय क्रमांक पटकावणारे विद्यार्थी :

  • इंग्रजी वादविवाद स्पर्धा – ममता कोंडे.
  • प्रश्नमंजुषा स्पर्धा – आदिती पाटील आणि स्वप्निल वडर.
  • विज्ञान मॉडेल – स्वरूपा पाटील आणि सारिका सुतार.

तृतीय क्रमांक पटकावणारे विद्यार्थी :

  • इंग्रजी वादविवाद स्पर्धा – तेहरीन हंदूर.
  • भावगीत स्पर्धा – अनुष्का पाटील.
  • इंग्रजी वादविवाद स्पर्धा – बीबी फातिमा सय्यद.

विद्यार्थ्यांनी मिळविलेले हे यश त्यांच्या मेहनतीचे, जिद्दीचे आणि सातत्यपूर्ण सरावाचे फलित असल्याचे महाविद्यालयाच्या वतीने सांगण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणे, त्यांच्यातील सर्जनशीलता विकसित करणे आणि आत्मविश्वास वाढविणे यासाठी अशा सांस्कृतिक स्पर्धा महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

या यशाबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण सेवा सोसायटीचे चेअरमन अ‍ॅड. चेतन मनेरीकर, कार्यदर्शी सुहास कुलकर्णी, महाविद्यालयाचे प्राचार्य पी. के. चापगावकर, निवृत्त प्राचार्य एस. एस. पाटील तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवर्गाने यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

विद्यार्थ्यांच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील लौकिकात भर पडली असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Do Share

You may have missed

error: Content is protected !!
Call Us