खानापुरात आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन!ಇಂದು ಖಾನಾಪುರದಲ್ಲಿ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಸ್ವಯಂಸೇವಕ ಸಂಘದ (ಆರ್ಎಸ್ಎಸ್) ಮಾರ್ಗ ಯಾತ್ರೆ!
खानापुरात आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन!
विजयादशमीनिमित्त भव्य पथसंचलन व सार्वजनिक समारंभाचे आयोजन; नरसिंह कुलकर्णी यांचे बौद्धिक मार्गदर्शन
खानापूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, खानापूर यांच्या वतीने विजयादशमीनिमित्त आज रविवार, दि. १५ नोव्हेंबर रोजी खानापूर शहरात भव्य पथसंचलन व सार्वजनिक समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
दुपारी ३ वाजता श्री स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल, खानापूर येथे कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर दुपारी ३.४५ वाजता स्वयंसेवकांचे पथसंचलन होणार असून, सायंकाळी ५.१५ वाजता सार्वजनिक समारंभ पार पडणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चापगाव येथील श्री. महादेव विष्णुपंत दळवी हे असणार आहेत. तर प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत सेवा प्रमुख श्री. नरसिंह कुलकर्णी हे उपस्थित राहून बौद्धिक मार्गदर्शन करणार आहेत.
शहरातील विविध प्रमुख मार्गांवरून हे पथसंचलन होणार असून, भगवा ध्वज, शिस्तबद्ध संचलन आणि स्वयंसेवकांचा सहभाग हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असणार आहे.
या पथसंचलनाचे ठिकठिकाणी स्वागत करण्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहावे, तसेच सायंकाळी होणाऱ्या सार्वजनिक समारंभातही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन खानापूर तालुका कार्यवाह ज्योतिबा कुपटगिरीकर यांनी केले आहे.
आज खानापूर शहरात होणाऱ्या या पथसंचलनाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.