Home » कारलगा: कारलग्यात रविवारपासून ‘सोंगी भारुड भजनी स्पर्धाचे आयोजन!

कारलगा: कारलग्यात रविवारपासून ‘सोंगी भारुड भजनी स्पर्धाचे आयोजन!

IMG_20261103_144129

खास दिवाळी पाडव्यानिमित्त कारलग्यात रंगणार ‘सोंगी भारुड भजनी स्पर्धे’चा सांस्कृतिक सोहळा!

प्रथम क्रमांकासाठी २५ हजार १ रुपये, द्वितीय १७ हजार १ रुपये, तर तृतीय क्रमांकासाठी ११ हजार १ रुपयांचे पारितोषिक

कारलगा : खास दिवाळी पाडव्याचे औचित्य साधून खानापूर तालुक्यातील कारलगा येथे श्री चव्हाटा तरुण भजनी मंडळ, घाडी गल्ली, कारलगा यांच्या वतीने रविवार दि. ८ नोव्हेंबर २०२६ रोजी भव्य ‘सोंगी भारुड भजनी स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे.

कारलगा येथील श्री चव्हाटा देवालयासमोर ही स्पर्धा पार पडणार असून, परिसरातील भजनप्रेमी, कलाकार आणि नागरिकांसाठी हा सांस्कृतिक सोहळा आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.

या कार्यक्रमाच्या पूजा कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान निवृत्त शिक्षक श्री. गोविंद नारायण कुट्रे भूषविणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन खानापूरचे आमदार श्री. विठ्ठल सोमण्णा हलगेकर व माजी आमदार श्री. अरविंद चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

कार्यक्रमात विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, खानापूर तालुक्यासह बेळगाव परिसरातील सामाजिक, राजकीय व धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे.

आकर्षक पारितोषिकांची पर्वणी

स्पर्धेतील विजेत्यांसाठी भरघोस पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.

  • प्रथम क्रमांक : २५ हजार १ रुपये
  • द्वितीय क्रमांक : १७ हजार १ रुपये
  • तृतीय क्रमांक : ११ हजार १ रुपये

याशिवाय पुरुष हार्मोनियम, नर्तकी, पुरुष कलाकार व महिला कलाकार अशा विविध कला प्रकारांसाठी विशेष पारितोषिकांची व्यवस्था करण्यात आली आहे.

स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क १,५०१ रुपये असून स्पर्धेसाठी प्रत्येक मंडळाला1 तास 45 मिनिटे कालावधी दिला जाणार आहे.

दरम्यान, शुक्रवार दि. ६ नोव्हेंबर व शनिवार दि. ७ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता भजन कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे.

या भव्य धार्मिक व सांस्कृतिक सोहळ्यात परिसरातील सर्व भजनी मंडळांनी आणि कलाकारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री चव्हाटा तरुण भजनी मंडळ, घाडी गल्ली, कारळगा व पंचकमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

स्थळ : श्री चव्हाटा देवालयासमोर, कारलगा, ता. खानापूर.

Do Share

You may have missed

error: Content is protected !!
Call Us