घोटगाळी – भारतीय जनता पार्टीने संपूर्ण देशभरात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सक्षम भारत बनवण्यासाठी घेतलेल्या योजना ह्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू आहे कर्नाटकातही भारतीय जनता पार्टीचे सरकार अनेक लोकोपयोगी योजना राबवून समाजाला सक्षम बनवण्यासाठी कार्य करत आहेत यासाठी भाजप तळागाळातील लोकांच्या पर्यंत पोहोचले असून पुन्हा एकदा भाजप वर जनतेने विश्वास राखावा यासाठी घर घर तिरंगा प्रमाणे हर घर भाजप अभियान राबवले जात आहे यासाठी भाजप विश्वास परिपत्रक अभियान घोटगाव येथे भारतीय जनता पार्टीचे नेते व महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल हलगेकर यांच्या नेतृत्वाखाली वितरित करण्यात आले घरोघरी सदर परिपत्रक वाटप करून अनेक वाहनांच्या वर देखील या विश्वास परिपत्रकाचे अनावरण करण्यात आले यावेळी घोटगाडी येथील बूथ क्रमांक 165 मध्ये हे अभियान राबवण्यात आले यावेळी भाजप नेते विठ्ठल हलगेकर यांच्यासमवेत राजेंद्र रायका,श्री आकाश अथनिकर, श्री सदानंद पाटील, श्री रवि पाटील,श्री हेमराज गडकरी, श्री पांडुरंग कुंभार, परशराम सूर्यवंशी, गणपति अष्टेकर, गजानन देसाई,नितेश वीर, व नागरिक उपस्थित होते.