Home » नागुर्डा -वाड्यातील नागेश देव मंदिरात चोरी! ನಾಗುರ್ಡಿ-ವಾಡಾದ ನಾಗೇಶ್ ದೇವ್ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಕಳ್ಳತನ

नागुर्डा -वाड्यातील नागेश देव मंदिरात चोरी! ನಾಗುರ್ಡಿ-ವಾಡಾದ ನಾಗೇಶ್ ದೇವ್ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಕಳ್ಳತನ

Screenshot_2026-10-08-10-04-20-39_a23b203fd3aafc6dcb84e438dda678b6

नागुर्डी-वाड्यातील नागेश देव मंदिरात चोरी

दानपेटीतील रोख रकमेसह सीसीटीव्हीची हार्ड डिस्क लंपास; परिसरात खळबळ

खानापूर : नागुर्डी-वाडा येथील नागेश देव मंदिरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून दानपेटीतील रोख रक्कम तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्याची हार्ड डिस्क लंपास केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. गुरुवारी सकाळी पूजा करण्यासाठी मंदिरात गेलेल्या ग्रामस्थांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास मंदिरात प्रवेश करून गाभाऱ्याबाहेर ठेवलेली दानपेटी फोडली. त्यातील रोख रक्कम लंपास केल्यानंतर आपली ओळख पटू नये आणि चोरीचा पुरावा पोलिसांच्या हाती लागू नये, या उद्देशाने मंदिरातील सीसीटीव्ही यंत्रणेची हार्ड डिस्कही चोरट्यांनी सोबत नेल्याचे समोर आले आहे.

सुदैवाने चोरट्यांनी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला नसल्याने देवाची दागिने व मूर्ती सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले. घटनेची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरताच ग्रामस्थांनी मंदिराकडे धाव घेतली.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून खानापूर तालुक्यातील विविध मंदिरांमध्ये घरफोडी व चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने भाविकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. धार्मिक स्थळांना लक्ष्य करणाऱ्या चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, तसेच या चोरीचा तातडीने तपास करून आरोपींना अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून तपास सुरू केला असून, सीसीटीव्हीची हार्ड डिस्कच चोरीला गेल्याने चोरट्यांचा माग काढण्याचे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. मंदिर परिसरातील तसेच आजूबाजूच्या भागातील उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

चोरीतील नेमकी रोख रक्कम किती होती, याची माहिती मंदिर व्यवस्थापनाकडून घेण्यात येत असून, पोलिस तपासानंतरच चोरीचा नेमका आकडा स्पष्ट होणार आहे.

Do Share
error: Content is protected !!
Call Us