ಖಾನಾಪುರದ ಅಭಿವೃದ್ಧಿಗಾಗಿ ರಾಜಕೀಯ ಬದಿಗಿಡಿ; ಎಲ್ಲರೂ ಒಟ್ಟಿಗೆ ಬನ್ನಿ! — ಸರ್ವಪಕ್ಷ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಶಾಸಕ ವಿಠ್ಠಲ್ ಹಲ್ಗೇಕರ್ ಅವರಿಂದ ಮನವಿ.
शहर-तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांवर ठोस उपाययोजनांची ग्वाही
खानापूर : खानापूर शहर व तालुक्यातील विविध प्रलंबित समस्या, नागरी प्रश्न तसेच भविष्यातील विकासकामांवर सविस्तर चर्चा करून त्यावर ठोस तोडगा काढण्याच्या उद्देशाने सोमवारी श्री. राजा शिवछत्रपती स्मारकाजवळील माजी आमदार कै. विठ्ठलराव यशवंतराव चव्हाण सभागृहात महत्त्वपूर्ण सर्वपक्षीय बैठक पार पडली. खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस विविध राजकीय पक्षांचे प्रमुख, स्थानिक नेते, अधिकारी, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत खानापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी रस्ते, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, अतिक्रमण, सरकारी जागांचा योग्य वापर, बाजारपेठ विकास, सुरक्षितता आणि पर्यावरण यांसह विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. नागरिकांनी आपल्या परिसरातील समस्या व विकासाच्या सूचना बैठकीत मांडल्या.
“विकासासाठी राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र यावे”
अध्यक्षस्थानावरून बोलताना आमदार विठ्ठल हलगेकर यांनी खानापूरच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले.
“खानापूरचा विकास हा कोणत्याही एका व्यक्तीचा किंवा एका पक्षाचा विषय नसून संपूर्ण तालुक्याचा आणि प्रत्येक नागरिकाचा विषय आहे. त्यामुळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून विकासाच्या मुद्द्यावर सर्वांनी सहकार्याची भूमिका घ्यावी,” असे त्यांनी सांगितले.
शहर व तालुक्याच्या विकासासाठी राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि नागरिकांनी आपल्या सूचना मोकळेपणाने मांडाव्यात. चांगल्या सूचनांचा स्वीकार करून त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
प्रत्येक ग्रामपंचायतीतून समस्यांची यादी तयार करणार
ग्रामीण भागातील मूलभूत समस्या सोडविण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर मूलभूत सुविधांची व प्रलंबित कामांची यादी तयार करण्याची सूचना करण्यात येणार असल्याचे आमदार हलगेकर यांनी सांगितले.
व्हीबीव्हीजी रामजी योजनेंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीला कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊन त्यातून गावातील प्रमुख समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच या योजनेच्या संदर्भात प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर जनस्पंदन कार्यक्रम घेऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
मासळी मार्केटजवळील रस्त्याचा प्रश्न मार्गी लावणार
खानापूर शहरातील मासळी मार्केटजवळील रखडलेल्या रस्त्याच्या कामाबाबतही बैठकीत चर्चा झाली. संबंधित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊन रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आमदार हलगेकर यांनी सांगितले.
गणेश चतुर्थीपूर्वी नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी रस्त्याची तात्पुरती व्यवस्था करण्यासाठीही संबंधित मालकांची मनधरणी करून प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
कुसमुळी-पारिश्वाड नजीकच्या मलप्रभेतील पाणी उपसा योजनेचा उल्लेख!
कुसमुळी, परिश्ववाड जवळ मला प्रवाह नदीतून बेळगाव भागात पाणी उपसा योजनेची कामे मागील आमदारकीच्या काळात झाल्याचे सांगून या संदर्भात आमदारांनी अधिक माहिती देण्याचे टाळले.
शहरातील अनेक प्रलंबित प्रश्नांवर चर्चा
बैठकीत सरकारी जमिनीवरील अतिक्रमणे हटविणे, सरकारी तलावांचे संरक्षण, रस्त्यांची तातडीने दुरुस्ती, फिश मार्केट परिसरातील रखडलेली कामे, नदी प्रदूषण रोखणे, सरकारी रुग्णालयातील आरोग्य सुविधा वाढविणे आणि शहरातील प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे या विषयांवर चर्चा झाली.
तालुका पंचायत क्षेत्रातील सरकारी जागांचा योग्य वापर करून व्यापारी संकुल व आधुनिक भाजी मार्केट उभारणे, सरकारी शाळांच्या इमारतींची दुरुस्ती, आवश्यक ठिकाणी स्ट्रक्चरल ऑडिट, प्रमुख भागात हायमास्ट दिवे, बसस्थानक परिसराचा विकास, बेघर नागरिकांसाठी निवासाची व्यवस्था आणि तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याबाबतही सूचना करण्यात आल्या. तसे निवेदन ही यशवंत बिर्जे यांनी यावेळी दिले
जुन्या न्यायालयाच्या जागेवर व्यापारी संकुलासाठी प्रयत्न
खानापूर येथील जुन्या न्यायालयाच्या आवारातील जागेचा योग्य वापर करून व्यापारी संकुल उभारण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचे आमदार हलगेकर यांनी सांगितले.
इको-सेंसिटिव्ह झोनमधील ८०६ कि.मी रस्त्यांचा प्रश्न
तालुक्यातील इको-सेंसिटिव्ह झोनमध्ये सुमारे ८०६ किलोमीटर रस्त्यांची कामे रखडली असल्याचे सांगत, आवश्यक एफसीए (Forest Conservation Act) परवानगी घेऊन नियमानुसार ही रस्त्यांची कामे हाती घेणे गरजेचे आहे. यासाठी संबंधित पातळीवर पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भविष्यात नवीन तालुके निर्माण होण्याची शक्यता
बेळगाव जिल्ह्यात भविष्यात आमदारांची संख्या वाढण्याची शक्यता असून, त्यानुसार नवीन तालुक्यांची पुनर्रचना होण्याची शक्यता असल्याचेही आमदार हलगेकर यांनी बैठकीत नमूद केले.
२०० मराठी शिक्षकांच्या पदांसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा
मराठी माध्यमातील सुमारे २०० शिक्षकांच्या पदांना मंजुरी मिळावी, यासाठी आपण मुख्यमंत्र्यांपर्यंत पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला असल्याचे आमदार हलगेकर यांनी सांगितले. तालुक्याच्या शैक्षणिक विकासाला आपले पहिले प्राधान्य असून मराठी शिक्षणाच्या प्रश्नासाठीही सातत्याने प्रयत्न सुरू आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
“विकासकामे झाली, पण प्रसिद्धीच्या मागे नाही”
तालुक्यात अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. मात्र, आपण प्रसिद्धीच्या मागे न लागता काम करण्याला प्राधान्य देत आहोत. स्थानिक नागरिकांना या विकासकामांची जाणीव आहे, असे आमदार हलगेकर यांनी सांगितले.
तालुक्यात भ्रष्टाचार होत असल्याच्या आरोपांबाबत बोलताना, अशा आरोपांना काही प्रमाणात आपलेच लोक जबाबदार असल्याचे त्यांनी नमूद केले. भ्रष्टाचाराविरोधात प्रत्येक व्यक्तीने आवाज उठविणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.
स्वच्छ, सुरक्षित आणि विकसित खानापूरचे उद्दिष्ट
खानापूर शहराचा विकास केवळ रस्ते आणि इमारती उभारण्यापुरता मर्यादित नसून नागरिकांचे जीवन अधिक सुखकर करण्यासाठी स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, सुरक्षितता आणि पर्यावरण या मूलभूत बाबींना समान महत्त्व देणे आवश्यक आहे, असे आमदार हलगेकर यांनी सांगितले.
विकासकामांमध्ये पारदर्शकता आणि नियोजन असणे गरजेचे असून लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिक यांच्यात योग्य समन्वय निर्माण झाल्यास अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लागू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सर्वपक्षीय सहकार्याची अपेक्षा
बैठकीत उपस्थित सर्वपक्षीय नेत्यांनी आपापली मते व सूचना मांडल्या. खानापूर शहर व तालुक्याच्या विकासाचा ठोस आराखडा तयार करून प्राधान्यक्रमानुसार विकासकामे हाती घेण्याची मागणी उपस्थितांनी केली.
या बैठकीस माजी आमदार दिगंबर पाटील, तहसीलदार दूंडाप्पा कुमार, लोंढा भागाचे माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबुराव देसाई, जांबोटी भागाचे नेते विलास बेळगावकर, प्रमोद कोचेरी, सदानंद पाटील, जयंत तिनेकर, रणजीत पाटील, निरंजन सरदेसाई, मुरलीधर पाटील, समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, सूर्याजी पाटील, के पी पाटील, मारुती परमेकर, इरफान तालिकोटी, यशवंत बिर्जे, मल्लाप्पा मारीहळ, गुंडू तोपीनकट्टी, बसवराज सानिकोप, चेतन मनेरीकर, यशवंत बिरजे, नारायण गुरव, रमेश धबाले, बाळाराम शेलार, प्रकाश देशपांडे, राजशेखर हिंडलगी, आदींनी त्यावेळी विचार मांडले. त्यावेळी भाजप समिती व विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्यासह स्थानिक नेते, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ಖಾನಾಪುರದ ಅಭಿವೃದ್ಧಿಗಾಗಿ ರಾಜಕೀಯ ಬದಿಗಿಡಿ; ಒಂದಾಗೋಣ
ಸರ್ವಪಕ್ಷ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಶಾಸಕ ವಿಠ್ಠಲ್ ಹಲ್ಗೇಕರ್ ಅವರ ಮನವಿ; ಬಾಕಿ ಇರುವ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಪರಿಹರಿಸುವ ಭರವಸೆ
ಖಾನಾಪುರ: ಖಾನಾಪುರ ನಗರ ಮತ್ತು ತಾಲೂಕಿಗೆ ಸಂಬಂಧಿಸಿದ ವಿವಿಧ ಬಾಕಿ ಇರುವ ಸಮಸ್ಯೆಗಳು, ನಾಗರಿಕ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಮತ್ತು ಭವಿಷ್ಯದ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಾರ್ಯಗಳಿಗೆ ಚರ್ಚಿಸಲು ಮತ್ತು ನಿರ್ದಿಷ್ಟ ಪರಿಹಾರಗಳನ್ನು ಕಂಡುಹಿಡಿಯಲು ‘ದಿವಂಗತ ವಿಠ್ಠಲ್ರಾವ್ ಯಶವಂತರಾವ್ ಚವಾಣ್ ಸಭಾಂಗಣ’ದಲ್ಲಿ ಸೋಮವಾರ ಸರ್ವಪಕ್ಷ ಸಭೆ ನಡೆಯಿತು. ಶಾಸಕ ವಿಠ್ಠಲ್ರಾವ್ ಹಲ್ಗೇಕರ್ ಅಧ್ಯಕ್ಷತೆಯಲ್ಲಿ ನಡೆದ ಸಭೆಯಲ್ಲಿ ವಿವಿಧ ರಾಜಕೀಯ ಪಕ್ಷಗಳ ನಾಯಕರು, ಅಧಿಕಾರಿಗಳು, ಪತ್ರಕರ್ತರು ಮತ್ತು ನಾಗರಿಕರು ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದ್ದರು.
ಸಭೆಯಲ್ಲಿ ರಸ್ತೆಗಳು, ನೈರ್ಮಲ್ಯ, ಆರೋಗ್ಯ ರಕ್ಷಣೆ, ಶಿಕ್ಷಣ, ಉದ್ಯೋಗ, ಅತಿಕ್ರಮಣಗಳು, ಸರ್ಕಾರಿ ಭೂಮಿಯ ಸರಿಯಾದ ಬಳಕೆ, ಮಾರುಕಟ್ಟೆ ಅಭಿವೃದ್ಧಿ, ಸುರಕ್ಷತೆ ಮತ್ತು ಪರಿಸರ ಸೇರಿದಂತೆ ಹಲವಾರು ವಿಷಯಗಳ ಕುರಿತು ಚರ್ಚೆಗಳು ನಡೆದವು. “ಖಾನಾಪುರದ ಅಭಿವೃದ್ಧಿಯು ಯಾವುದೇ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಅಥವಾ ಪಕ್ಷದ ಕಾಳಜಿಯಲ್ಲ, ಬದಲಾಗಿ ಇಡೀ ತಾಲೂಕಿನ ಕಾಳಜಿಯಾಗಿದೆ. ಅಭಿವೃದ್ಧಿಗಾಗಿ ರಾಜಕೀಯ ಭಿನ್ನಾಭಿಪ್ರಾಯಗಳನ್ನು ಬದಿಗಿಟ್ಟು ಎಲ್ಲರೂ ಸಹಕರಿಸಬೇಕು” ಎಂದು ಶಾಸಕ ಹಲ್ಗೇಕರ್ ಒತ್ತಾಯಿಸಿದರು.
ಗ್ರಾಮೀಣ ಪ್ರದೇಶಗಳಲ್ಲಿನ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಪರಿಹರಿಸಲು ಪ್ರತಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಮೂಲಭೂತ ಸೌಕರ್ಯಗಳು ಮತ್ತು ಬಾಕಿ ಇರುವ ಕೆಲಸಗಳ ಪಟ್ಟಿಯನ್ನು ಸಿದ್ಧಪಡಿಸಬೇಕು ಎಂದು ಅವರು ಹೇಳಿದರು. ವಿಬಿವಿಜಿ ರಾಮ್ಜಿ ಯೋಜನೆಯಡಿ ಪ್ರತಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ಗೆ ಕೋಟ್ಯಂತರ ರೂಪಾಯಿಗಳ ಹಣವನ್ನು ಒದಗಿಸುವ ಮೂಲಕ ಪ್ರಮುಖ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಪರಿಹರಿಸಲು ಪ್ರಯತ್ನಿಸಲಾಗುವುದು ಮತ್ತು ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ‘ಜನ್-ಸ್ಪಂದನ್’ (ಸಾರ್ವಜನಿಕ ಕುಂದುಕೊರತೆ ಪರಿಹಾರ) ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ನಡೆಸಲಾಗುವುದು.
ಖಾನಾಪುರ ನಗರದ ಮೀನು ಮಾರುಕಟ್ಟೆಯ ಬಳಿ ಸ್ಥಗಿತಗೊಂಡಿರುವ ರಸ್ತೆ ಯೋಜನೆಯನ್ನು ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಲು ಪ್ರಯತ್ನಿಸಲಾಗುವುದು ಮತ್ತು ಸಂತ್ರಸ್ತ ರೈತರಿಗೆ ನ್ಯಾಯ ಒದಗಿಸಲಾಗುವುದು ಎಂದು ಅವರು ಭರವಸೆ ನೀಡಿದರು. ಗಣೇಶ ಚತುರ್ಥಿಯ ಮೊದಲು ತಾತ್ಕಾಲಿಕ ರಸ್ತೆಯನ್ನು ಒದಗಿಸಲು ಸಹ ಪ್ರಯತ್ನಿಸಲಾಗುವುದು ಎಂದು ಅವರು ಸ್ಪಷ್ಟಪಡಿಸಿದರು. ಪರಿಸರ ಸೂಕ್ಷ್ಮ ವಲಯದೊಳಗಿನ 806 ಕಿಲೋಮೀಟರ್ ರಸ್ತೆಗಳಲ್ಲಿ ಸ್ಥಗಿತಗೊಂಡಿರುವ ಕೆಲಸವನ್ನು ತ್ವರಿತಗೊಳಿಸಲು ಅಗತ್ಯ ಎಫ್ಸಿಎ (ಅರಣ್ಯ ಸಂರಕ್ಷಣಾ ಕಾಯ್ದೆ) ಅನುಮತಿಗಳನ್ನು ಪಡೆಯುವ ಮೂಲಕ ಮುಂದಿನ ಕ್ರಮಗಳು ನಡೆಯುತ್ತಿವೆ ಎಂದು ಅವರು ಉಲ್ಲೇಖಿಸಿದರು.
ಶಿಕ್ಷಣವು ಪ್ರಮುಖ ಆದ್ಯತೆಯಾಗಿದೆ ಎಂದು ಒತ್ತಿ ಹೇಳಿದ ಅವರು, ಮರಾಠಿ ಮಾಧ್ಯಮ ಶಾಲೆಗಳಲ್ಲಿ 200 ಬೋಧಕ ಹುದ್ದೆಗಳಿಗೆ ಅನುಮೋದನೆ ಪಡೆಯಲು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯೊಂದಿಗೆ ಪತ್ರವ್ಯವಹಾರ ನಡೆಸಿದ್ದೇನೆ ಎಂದು ಹೇಳಿದರು. ಹಳೆಯ ನ್ಯಾಯಾಲಯದ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ವಾಣಿಜ್ಯ ಸಂಕೀರ್ಣವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲು ಪ್ರಯತ್ನಿಸಲಾಗುತ್ತಿದೆ ಎಂದು ಅವರು ಹೇಳಿದರು. ಸಭೆಯಲ್ಲಿ ಮಾಜಿ ಶಾಸಕ ದಿಗಂಬರ ಪಾಟೀಲ, ತಹಸೀಲ್ದಾರ್ ದೂದಪ್ಪ ಕುಮಾರ, ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯಿತಿ ಮಾಜಿ ಸದಸ್ಯ ಬಾಬುರಾವ್ ದೇಸಾಯಿ, ಜಾಂಬೋಟಿ ಭಾಗದ ಮುಖಂಡರುಗಳಾದ ವಿಲಾಸ ಬೆಳಗಾಂವಕರ, ಪ್ರಮೋದ ಕೋಚಾರಿ, ಸದಾನಂದ ಪಾಟೀಲ, ಜಯಂತ್ ತಿನೇಕರ್, ರಂಜಿತ್ ಪಾಟೀಲ, ರಂಜಿತ್ ಪಾಟೀಲ, ಬಿ.ಜೆ. ಮಾರಿಹಾಳ್, ಗುಂಡು ತೋಪಿನಕಟ್ಟಿ, ಚೇತನ್ ಮನೇರಿಕರ್, ಶಂಕರ ಪಾಟೀಲ್, ದಲಿತ ಮುಖಂಡರು ರಾಜ್ಯಶೇಖರ್ ಹಿಂಡಲಗಿ, ಭರಮಣಿ ಪಾಟೀಲ್, ದತ್ತಾ ಕದಂ, ಲಕ್ಷ್ಮಣ ತಿರವೀರ್, ನಾರಾಯಣ ಗುರವ, ಮತ್ತು ಬಲರಾಮ್ ಶೇಲಾರ್-ಇತರ ಸ್ಥಳೀಯ ಮುಖಂಡರು, ಪತ್ರಕರ್ತರು ಮತ್ತು ನಾಗರಿಕರೊಂದಿಗೆ.