Screenshot_2026-08-21-15-06-06-19_21988050ec06b2a70877acc6d4501398

दोषींवर कठोर कारवाई करून पीडित कुटुंबाला न्याय देण्याची मागणी

खानापूर | प्रतिनिधी

सांगली जिल्ह्यातील कुपवाड परिसरात खानापूर तालुक्यातील हेब्बाळ येथील केसरेकर दांपत्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर खानापूरचे आमदार विठ्ठल सोमण्णा हलगेकर यांनी सरकारकडे निवेदन सादर करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री डी के शिवकुमार यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील सांगली येथे झालेल्या हत्याकांडा संदर्भात माहिती दिली खानापूर तालुक्यातील गरीब व रोजंदरीवर काम करणाऱ्या या मोहन केसरीकर व मनीषा केसरीकर या दांपत्याची एका माते पेरणे हत्या केल्याचे निदर्शनाला आणून दिले व या कुटुंबाला कर्नाटक राज्य सरकार मार्फत अधिकाधिक अर्थसहाय्य मिळवून देण्याची मागणी केली दरम्यान मुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी आपत्कालीन सहाय्य निधीतून दोन लाख रुपये मंजूर करून देण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती आमदार विठ्ठल हलगेकर यांनी खानापूर लाईव्ह बोलताना दिली.

हेब्बाळ येथील रहिवासी मोहन नागप्पा केसरेकर व त्यांच्या पत्नी मनीषा मोहन केसरेकर हे रोजगारानिमित्त सांगली परिसरात वास्तव्यास होते. कुपवाड परिसरात त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यात मनीषा केसरेकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर मोहन केसरेकर हे गंभीर जखमी झाले. या घटनेने खानापूर तालुक्यात तसेच सीमा भागातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे.

सरकारचे तातडीने लक्ष वेधले

या गंभीर घटनेची दखल घेत आमदार विठ्ठल हलगेकर यांनी दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी सरकारकडे निवेदन पाठविले आहे. सीमाभागातील नागरिकांवर अशा प्रकारचे हल्ले होणे ही अत्यंत गंभीर बाब असून, घटनेची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी निवेदनातून मांडली आहे.

पीडित कुटुंबाला मदतीची मागणी

हल्ल्यात मनीषा केसरेकर व मोहन केसरकर या दांपत्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या एका तेरा वर्षीय मुलाचा व 16 वर्षीय मुलीचा आधार हरपला आहे त्यांच्या उर्वरित संरक्षणासाठी व शिक्षणासाठी पीडित कुटुंबाला शासनाकडून योग्य ती आर्थिक मदत, उपचारासाठी सहकार्य आणि आवश्यक संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी आमदार हलगेकर यांनी केली आहे.

तपास जलदगतीने पूर्ण करण्याची मागणी

हल्ल्याची पार्श्वभूमी, आरोपींची भूमिका आणि घटनेमागील कारणे यांचा तपास निष्पक्षपणे व जलदगतीने करण्यात यावा. तपास पूर्ण करून दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

सीमाभागातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न

खानापूर तालुक्यातील अनेक नागरिक रोजगारासाठी महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये स्थलांतरित होतात. त्यामुळे सीमाभागातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही या घटनेमुळे ऐरणीवर आला आहे. परराज्यात रोजगारासाठी जाणाऱ्या नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळणे आवश्यक असून, त्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

सरकारकडे पाठपुरावा सुरू

केसरेकर दांपत्यावरील हल्ल्याच्या प्रकरणात न्याय मिळेपर्यंत शासनस्तरावर पाठपुरावा करण्याची भूमिका आमदार हलगेकर यांनी घेतली आहे. या प्रकरणातील दोषींना कोणतीही सवलत न देता कठोर कारवाई व्हावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी खानापूर तालुक्यातून होत आहे.

खानापूर लाईव्ह
तालुक्यातील विश्वसनीय आणि वेगवान वेबसाईट

Do Share
error: Content is protected !!
Call Us