IMG_20260819_114308

केसरेकर दाम्पत्याच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत निधी संकलनाचा स्तुत्य उपक्रम

खानापूर : सांगली-कुपवाड येथे घडलेल्या दुर्दैवी हल्ल्यात हेब्बाळ येथील कै. मनीषा मोहन केसरेकर व कै. मोहन नागाप्पा केसरेकर या दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे त्यांच्या १३ वर्षांच्या मुलगा आणि १६ वर्षांच्या मुलीवर आई-वडिलांचे छत्र हरपले आहे. अशा कठीण प्रसंगी या दोन्ही मुलांच्या शिक्षण व संगोपनासाठी बेळगाव पीपल्स लोकसेवा फाउंडेशन ट्रस्ट, पुणे (बीपीएल फाउंडेशन) यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

मुलांचे शिक्षण खंडित होऊ नये, त्यांच्या भविष्यासाठी आर्थिक आधार मिळावा आणि या संकटातून सावरण्यासाठी समाजाने पुढे यावे, या उद्देशाने फाउंडेशनच्या माध्यमातून मदत निधी संकलित करण्यात येत आहे. जमा होणारा निधी संबंधित मुलांच्या शिक्षण व संगोपनासाठी वापरण्यात येणार आहे.

या उपक्रमातून ‘माणुसकी अजूनही जिवंत आहे’ याचा प्रत्यय येत असून, समाजातील दानशूर व संवेदनशील नागरिकांनी आपल्या क्षमतेनुसार या कुटुंबाला मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, मदत करणाऱ्या नागरिकांचा स्वतंत्र ग्रुप तयार करण्यात येणार असून, त्यामध्ये केसरेकर कुटुंबातील मुलीचाही समावेश राहणार आहे. त्यामुळे मदत निधीचा योग्य उपयोग आणि मुलांच्या भविष्यासाठी आवश्यक सहकार्य यामध्ये पारदर्शकता राखण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

संकटाच्या काळात केवळ सहानुभूती न दाखवता प्रत्यक्ष मदतीसाठी पुढे येणाऱ्या बीपीएल फाउंडेशनच्या या सामाजिक उपक्रमाचे खानापूर लाईव्हकडून मनःपूर्वक कौतुक करण्यात येत आहे.

“एका कुटुंबावर आलेले संकट हे संपूर्ण समाजाचे दुःख आहे. या दोन मुलांच्या शिक्षणासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येकाने आपल्या परीने योगदान द्यावे,” असे आवाहन करण्यात आले आहे.

मदतीसाठी संपर्क :
बेळगाव पीपल्स लोकसेवा फाउंडेशन ट्रस्ट, पुणे
📞 9860532161
📞 9850174746

Do Share
error: Content is protected !!
Call Us