Oplus_16908288

Oplus_16908288

बेळगाव, दि. २० ऑगस्ट : खानापूर तालुक्यातील हलकर्णी व गांधीनगर येथील स्मशानभूमीशी संबंधित प्रलंबित प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात संबंधित ग्रामस्थांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, हलकर्णी व गांधीनगर परिसरातील मराठा, मागासवर्गीय, गोसावी समाजासाठी स्मशानभूमी मंजूर करण्यात आली आहे परंतु या स्मशानभूमीतून राजकीय दबावाखाली काही व्यक्ती स्वतंत्र रस्ता करून आपल्या प्रॉपर्टी साठी लाभ घेत आहेत. परंतु सदर समशानभूमी ही सर्व समाजासाठी राखीव ठेवण्यात आले असताना या ठिकाणी खाजगी लोकांनी रस्ता करणे चुकीचे आहे तो तात्काळ थांबवण्यात यावा यासाठी यापूर्वीही प्रशासनाकडे मागणी करण्यात आली होती. मात्र, अद्याप या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही.

दिनांक २० जुलै २०२६ रोजी याबाबत तहसीलदारांकडे निवेदन देऊनही अपेक्षित कार्यवाही झालेली नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे स्मशानभूमीसाठी आवश्यक जागेचा प्रश्न तातडीने निकाली काढून संबंधित नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे करण्यात आली आहे.

या प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन जागेची पाहणी करावी आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देऊन कार्यवाही करावी, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनातील प्रमुख मागण्या :

  1. विविध जातीच्या समाजासाठी राखीव समशानभूमीतून राजकीय व्यक्तीकडून रस्त्यासाठी होत असलेला प्रयत्न थांबवावा. संबंधित स्मशानभूमीच्या जागेचा प्रश्न तातडीने सोडवावा.
  2. सदर स्मशानभूमीला कंपाउंड घालण्यासाठी निधी मंजूर करून स्मशानभूमीचे संरक्षण करा.

निवेदनाची प्रत संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांकडेही देण्यात आली आहे.

या निवेदन व कायदेशीर पाठपुराव्यात सागर अष्टेकर, कुबेर नाईक, हरीश शिलवंत, मागलदास गोसावी, भाजप युवा नेते पंडित ओगले , अॅड. आकाश अथणिकर, बळीराम वांद्रे, राकेश मुगळी , प्रतमेश बुवाजी आणि राहुल बजंत्री यांचा सहभाग असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

Do Share
error: Content is protected !!
Call Us