खानापूर / पुणे : बेळगांव पीपल्स लोकसेवा फाउंडेशन ट्रस्ट, पुणे या सामाजिक संस्थेचा १० वा वर्धापन दिन सोमवार, दि. १० ऑगस्ट २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. समाजसेवा, सामाजिक बांधिलकी आणि बेळगावकरांच्या एकजुटीचा वारसा जपत संस्थेने गेल्या दशकभरात विविध सामाजिक व विधायक उपक्रम राबवून समाजात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.
यावेळी संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. संदीप घाडी म्हणाले की, सेवा, संस्कार आणि समर्पणाचा एक दशकाचा अभिमानास्पद प्रवास हा नव्या आणि अधिक मोठ्या पर्वाची सुरुवात आहे. संस्थेच्या माध्यमातून भविष्यातही विविध सामाजिक उपक्रम सुरू ठेवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
५१ उद्योजकांचा ‘उद्योगरत्न’ पुरस्काराने सन्मान
वर्धापन दिनाचे औचित्य साधून पुणेस्थित बेळगावकर उद्योजकांच्या उद्योगक्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यासाठी ‘उद्योगरत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. कर्तृत्वातून उद्योगविश्वात निर्माण केलेली ओळख, रोजगारनिर्मिती आणि सामाजिक योगदान यांचा गौरव करणे हा या पुरस्कारामागील प्रमुख उद्देश होता.
संस्थेच्या वतीने ५१ बेळगावकर उद्योजकांना उद्योगरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार प्राप्त उद्योजक
श्री. बाबुराव गुरव (मेंडेगाळी), श्री. लक्ष्मणराव काकतकर (मेंडेगाळी), श्री. परशुराम चौगुले (गर्लगुंजी), श्री. प्रकाश दुर्गत (हाल झुंजवाड ), श्री. लक्ष्मण मंतूंर्गेकर (भांबर्डा ), श्री. कृष्णाजी चौरी (भांबर्डा), श्री. रावजी पाटील (अनगडी ), श्री. कल्लाप्पा पाटील (हतरवाड);
श्री. मारुती वाणी (मेंडेगाळी), श्री. पिटर डिसोझा (माचीगड), श्री. बाळासाहेब देसाई (शिवोली ), श्री. मोहन पाटील (करंबळ), श्री. शांताराम पाटील (सागरे), श्री. अशोक गुरव (मेंडेगाळी), श्री. सहदेव पाटील (मेरडा), श्री. लक्ष्मण गुंडप (अनगडी );
श्री. गंगाराम मिराशी (अनगडी ), श्री. कल्लाप्पा पाटील (सागरे), श्री. नारायण पाटील (सागरे), श्री. अशोक पाटील (हलसाल), श्री. मोनेश्री सुतार (अनगडी), श्री. नागेश वाणी (मेंडेगाळी), श्री. जनार्दन जाधव (मेंडेगाळी), श्री. पांडुरंग पाटील (मेंडेगाळी);
तसेच श्री. भगवंत सोमाण्णा चन्नेवाडकर (करजगी ), श्री. शांताराम यशवंत पाटील (हलसाल), श्री. ज्ञानेश्वर सिद्धाप्पा पाटील (सागरे), श्री. विलास पुंडलिक गुरव (मेंडेगाळी), श्री. दत्तात्रय नारायण देसाई (शिवोली), श्री. राजाराम निंगाप्पा शिंदे (किरहलशी ), श्री. विठ्ठल सदाप्पा सावंत (किरहलशी ), श्री. माळती यल्लाप्पा मनतूंगेकर (भांबर्डा), श्री. दामोदर लक्ष्मण पाटील (हात्तरवाड), श्री. ईश्वर नारायण गुरव (मेंडेगाळी);
श्री. रामचंद्र हुवाप्पा निलजकर (गोदगेरी), श्री. उमाजी हनुमंत देवककर (हलकर्णा), श्री. राजकुमार श्रीकांत सुतार (अनगडी), श्री. चंद्रकांत पाटील (नरशेवाडी), श्री. परशुराम भरमाणी पाटील (भांबर्डा), श्री. रामू कल्लाप्पा गुरव (अनगडी ), श्री. प्रभाकर नारायण देसाई (शिवोली ), श्री. माळती दत्तू मुळकर (आसोगा), श्री. ज्योतिबा भरमाणी पाटील (हरुरी), श्री. मारुती नारायण जाधव (मेंडेगाळी);
तसेच श्री. सुरेश नारायण जाधव (मेंडेगाळी), श्री. प्रभाकर नारायण देसाई (शिवोली ), श्री. कृष्णाजी यल्लाप्पा मंतर्गेकर (भांबर्डा ), श्री. नारायण विठ्ठल गुंडप (अनगडी ), श्री. अशोक वीर (मलवाड), श्री. ज्ञानेश्वर राजाराम पाटील (सागरे), श्री. मारुती बाबुराव कुलम (हलसाल), श्री. सुराप्पा गुरव (मेंडेगाळी), श्री. नारायण भरमाणी पाटील (मेरडा) यांचा उद्योगरत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला.
बेळगावकरांच्या एकजुटीला नवी दिशा
या कार्यक्रमाला बेळगांव पीपल्स लोकसेवा फाउंडेशन ट्रस्टचे पदाधिकारी, संचालक मंडळ, खानापूर-बेळगाव मित्रमंडळाचे पदाधिकारी, पुणेस्थित बेळगावकर नागरिक तसेच मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
बेळगावकर उद्योजकांनी आपल्या कर्तृत्वातून उद्योगविश्वात निर्माण केलेली ओळख, रोजगारनिर्मिती आणि सामाजिक योगदान यांचा गौरव करण्याच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
मान्यवरांचे आभार
गौरव सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविणाऱ्या सर्व मान्यवरांचे, पुरस्कारार्थी उद्योजकांचे, हितचिंतकांचे आणि बेळगावकर बांधवांचे संस्थेचे उपाध्यक्ष श्री. सुधीर शिवणगेकर यांनी मनःपूर्वक आभार मानले.
समाजसेवेचा हा प्रवास यापुढेही अधिक व्यापक स्वरूपात अखंड सुरू राहावा आणि बेळगावकरांच्या एकजुटीला नवी दिशा मिळावी, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.