खानापूर: तालुक्यातील मंतुर्गा येथील रहिवासी व महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस श्री आबासाहेब नारायण दळवी यांचे बंधू श्री मारुती नारायण दळवी (वय ६५) यांचे आज मंगळवार, दिनांक २३ जून २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता उपचारादरम्यान निधन झाले.
सोमवारी शिवाजीनगर येथे दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर त्यांना तातडीने बेळगाव येथील KLE Society संलग्न रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय उपचार सुरू असतानाही त्यांच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा झाली नाही आणि अखेर त्यांनी मृत्यूशी सुरू असलेली झुंज हरली.
त्यांच्या निधनाची बातमी समजताच मंतुर्गा परिसरासह महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे. शांत, मनमिळावू व सामाजिक कार्यात सहभाग घेणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती.
त्यांच्यावर आज रात्री ८.०० वाजता मंतुर्गा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.