file_00000000a84c71faadf86fbf63025dba

खानापूर : येथील स्वामी विवेकानंद शिक्षण सेवा सोसायटी संचलित “श्री स्वामी विवेकानंद पदवीपूर्व (कला, वाणिज्य, विज्ञान) महाविद्यालय” या महाविद्यालयाला शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थी व पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महाविद्यालयात गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम, करिअर मार्गदर्शन, यशस्वी व्यक्तींची प्रेरणादायी व्याख्याने तसेच कला व क्रीडा क्षेत्रातील गुणांना प्रोत्साहन दिले जात असल्याने अल्पावधीतच महाविद्यालयाने विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन केला आहे.
महाविद्यालयाच्या शैक्षणिक उपक्रमांमुळे यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत तब्बल ८० टक्के प्रवेश पूर्ण झाले असल्याची माहिती प्राचार्य श्री पी. के. चापगांवकर आणि मार्गदर्शक श्री एस. एस. पाटील यांनी दिली.
संस्थेचे चेअरमन अधिवक्ता चेतन अरुण मणेरीकर तसेच कार्यदर्शी श्री सुहास वामनराव कुलकर्णी यांचे महाविद्यालयाला सातत्याने मार्गदर्शन व सहकार्य लाभत असल्याचेही प्राचार्य श्री पी. के. चापगांवकर यांनी सांगितले.

Khanapur: The “Shri Swami Vivekananda Undergraduate College (Arts, Commerce, Science),” managed by the local Swami Vivekananda Shikshan Seva Society, is receiving an overwhelming response from students and parents regarding the admission process for the academic year 2026-27. The college has rapidly earned the trust of students by providing quality education, organizing various initiatives for their holistic development, offering career guidance, hosting inspirational lectures by successful personalities, and actively encouraging talent in the fields of arts and sports.
Principal Mr. P.K. Chapgaonkar and Mentor Mr. S.S. Patil informed that, owing to the college’s academic initiatives, a remarkable 80 percent of admissions for the current year’s intake have already been completed.
Principal Mr. P.K. Chapgaonkar further stated that the college continues to benefit from the constant guidance and support of the institution’s Chairman, Advocate Chetan Arun Manerikar, and Secretary, Mr. Suhas Vamanrao Kulkarni.

खानापूर येथील स्वामी विवेकानंद शिक्षण सेवा सोसायटी संचलित श्री स्वामी विवेकानंद पदवी महाविद्यालय येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रियेला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, अनुभवी प्राध्यापक वर्ग, विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांमुळे महाविद्यालयाने अल्पावधीतच विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन केला आहे.
मागील शैक्षणिक वर्षात महाविद्यालयात विविध उपक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी करिअर मार्गदर्शन शिबिरे, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, व्याख्यानमाला, विज्ञान व वाणिज्य प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, एनएसएस उपक्रम आणि सामाजिक जाणीव निर्माण करणारे कार्यक्रम घेण्यात आले.
महाविद्यालयात गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच शालेय व महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांनाही विशेष प्राधान्य दिले जाते. विद्यार्थ्यांना खेळामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी विविध क्रीडा साहित्य व प्रशिक्षकांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अनेक विद्यार्थ्यांनी तालुका व जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये यश मिळवून महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे.
विद्यार्थ्यांच्या करिअर घडणीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असून रोजगाराभिमुख उपक्रम, कौशल्य विकास प्रशिक्षण, डिजिटल शिक्षण, मुलाखत तंत्र मार्गदर्शन आणि उच्च शिक्षणासाठी आवश्यक माहिती विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हे महाविद्यालय शिक्षणाचे विश्वासार्ह केंद्र ठरत आहे.
यावर्षीही कला, वाणिज्य व विज्ञान शाखांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थी व पालकांकडून मोठ्या प्रमाणात चौकशी सुरू असून प्रवेश प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे शाळेच्या विश्वस्तानी खानापूर लाईव्ह बोलताना सांगितले.

Khanapur: The admission process for the academic year 2026-27 at Shri Swami Vivekananda Degree College—operated by the local Swami Vivekananda Education Service Society—is receiving an enthusiastic response from students. Thanks to its commitment to quality education, an experienced faculty, diverse academic and cultural initiatives, and various schemes implemented for the holistic development of students, the college has successfully earned the trust of the student community within a short span of time.
During the previous academic year, the college successfully organized a wide array of activities. To foster the personality development of students, various programs were conducted, including career guidance camps, training for competitive examinations, lecture series, science and commerce exhibitions, cultural events, NSS activities, and initiatives aimed at raising social awareness.
In addition to providing quality education, the college places special emphasis on sports competitions at both the school and collegiate levels. To encourage students to participate in sports, the college has made available various sports equipment and coaching facilities. Many students have brought laurels to the college by achieving success in competitions held at the Taluka and District levels.
Special efforts are being undertaken to shape the careers of students; to this end, employment-oriented initiatives, skill development training, digital learning resources, guidance on interview techniques, and essential information regarding higher education opportunities are being made available to them. Consequently, this college is emerging as a trusted hub for education for students hailing from rural areas.
The college administration has noted that, this year as well, there is a significant volume of inquiries from students and parents regarding admissions across the Arts, Commerce, and Science streams, indicating a strong and positive response to the ongoing admission process.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us